वापी-यावल बसचे ब्रेक फेल होऊन झालेल्या अपघातात १० प्रवाशी जखमी
वाहन चालकाच्या दक्षतेने भिषण जिवीतहानी टळली
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२६ डिसेंबर २३ मंगळवार
येथील यावल आगारातुन जाणारी वापी-यावल एस बसचा साक्री-नवापुर गावाच्या मध्यभागी दहिवेल गावाजवळ अपघात होवुन दहा प्रवाशी जखमी झाल्याचे वृत्त हाती आले आहे.
या संदर्भातील मिळालेली माहिती अशी की,यावल आगारातुन वापी (गुजरात)साठी गेलेली बस एम एच १८ बिएल ३३७७ जाणारी बस चालक के जी शिरसाडे ( यावल आगारात कार्यरत असलेले ) चालक यांच्या ताब्यातील वापीकडुन यावलसाठी परतीच्या मार्गावर असलेली एसटी बस ही सकाळी ११ ते १२ वाजेच्या दरम्यान दहिवेलजवळ असलेल्या बोरकीखाडी गावाजवळ अचानक गाडीचे ब्रेक निकामी झालेल्याचे लक्षात येताच वाहनचालक के.जी.शिरसाडे यांनी प्रसंगवधानाने सुमारे अर्धा किलोमिटर बसला चालवित बसवर नियंत्रण ठेवल्याने मोठा अपघात टाळुन मोठी जिवितहानी टाळण्यात यश मिळवले परन्तु या अपघातात १० प्रवासी जखमी झाले आहेत.या बसमध्ये चाळीसच्या जवळपास प्रवासी प्रवास करीत असल्याची माहिती मिळाली आहे.अपघातात दहा प्रवासी जखमी झाल्याची माहीती समोर आली आहे.याबाबत यावल एसटी आगाराचे व्यवस्थापक दिलीप महाजन यांच्याशी विचारणा केली असता त्यांनी सदर बसचा अपघात झाल्याची आपल्याला माहिती प्राप्त झाली असुन अपघातस्थळी साक्री एसटी आगाराचे कर्मचारी दाखल झाले आहेत.अपघात कसा झाला याची सविस्तर माहिती आपण घेत असल्याचे त्यांनी सांगितले.दरम्यान या अपघातात यावलचे तिन आणी साकळी तालुका यावल येथील दोन प्रवासी जखमी झाले असुन प्रवाशांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याचे वृत्त आहे.