Just another WordPress site

पोलीस व होमगार्ड कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी युवा स्वाभिमान पार्टी जिल्हाध्यक्षांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण

जळगाव-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.२६ जानेवारी २४ शुक्रवार

राज्यभरातील पोलीस अधिकारी,कर्मचारी,होमगार्ड व सैनिक यांच्या विविध मागण्या मान्य करून त्यांना न्याय देण्यात यावा याकरिता युवा स्वाभिमान पार्टी जिल्हाध्यक्ष महेंद्रभाऊ पाटील यांनी आज दि.२६ जानेवारी पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात केली असून मागण्या मान्य न झाल्यास दि.२८ जानेवारी २४ रविवार पासून पाणी त्याग करून आंदोलन अधिक तीव्र करणार असल्याचे जिल्हाध्यक्ष महेंद्रभाऊ पाटील यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

याबाबत दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आहे की,राज्यभरातील पोलीस अधिकारी,कर्मचारी,होमगार्ड व सैनिक यांना कामगार कायद्याअंतर्गत किमान वेतन कायद्याप्रमाणे वेळेत कपात व पगार वाढ करण्यात यावी,८ तासापेक्षा जास्त कर्तव्य केल्यास त्यांना ओवर टाईमदेण्यात यावा,इतर शासकीय-निमशासकीय विभागाप्रमाणें त्याचप्रमाणे त्यांच्या वेतनात २५ % वाढ करण्यात यावी.माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार होमगार्ड सैनिकांना सातवा वेतननुसार ९९० रुपये दर प्रमाणे मानधन वेतन वाढवून देण्यात यावे तसेच पोलिस अधिकारी,कर्मचारी होमगार्ड सैनिक यांना इतर शासकीय विभागाप्रमाणे ५ दिवसाचा आठवडा करण्यात यावा.होमगार्ड सैनिकांना ३६५ दिवस काम मिळावे,बॉम्बे होमगार्ड अधिनियम १९४७ कलम ९ नुसार होमगार्ड सैनिकास ईतर शासकीय-निमशासकीय विभागा प्रमाणें मेडीकल सुविधा व PF,TA,DA ई.सोयी सेवा सुविधा देण्यात याव्या.प्रत्येक पोलिस वसाहतीमध्ये तात्काळ आरोग्य सेवेसाठी मल्टी-स्पेशालिस्ट हॉस्पिटल निर्माण करण्यात यावे,आजी-माजी पोलीस अधिकारी,कर्मचारी,होमगार्ड सैनिक यांना व त्यांच्या परिवाराला सर्व आजारांवर इतर शासकीय निमशासकीय प्रमाणे आज पावतो व निवृत्ती नंतरही हॉस्पिटल सुविधा देण्यात यावी,होमगार्ड सैनिकांचे निवृत्तीची वयोमर्यादा ५८ वरून ६० करून होमगार्ड सैनिकांची तीन वर्षे पुर्नः नोंदणी पद्धत बंद करण्यात यावी,होमगार्ड सैनिंकासाठी राहण्यासाठी स्वतंत्र वसाहती निर्माण करावी किंवा पोलीस वसाहतीमध्ये त्यांना राहण्यासाठी स्थान मिळावे,गैर-संविधानिक पद्धतीने आज पावतो विविध स्वरूपाच्या आंदोलनामध्ये व विविध कारणा ने कमी झालेले होमगार्ड सैनिकांना परत कामावर घेण्यात यावे,आजी-माजी पोलीस अधिकारी,कर्मचारी,होमगार्ड सैनिक यांना अटल पेन्शन योजना तात्काळ सुरू करण्यात यावी,आजी-माजी पोलीस अधिकारी कर्मचारी होमगार्ड सैनिक यांचे प्रश्न शासन दरबारी मांडण्यासाठी एक राखीव जागा विधानपरिषद,राज्यसभा मध्ये तात्काळ मिळावी,होमगार्ड सैनिकांसाठी किंवा त्यांच्या परिवारासाठी कर्ज व इतर सुविधेसाठी सोसायटी निर्माण करण्यासाठी तात्काळ परवानगी द्यावी,आजी-माजी पोलिस अधिकारी ,कर्मचारी होमगार्ड सैनिक यांच्या पाल्यांना भरतीमध्ये मिल्ट्रीप्रमाणे इतर फोर्सेसप्रमाणे अनुकंप तत्व प्रणालीमध्ये २५ % आरक्षित स्थान मिळावे तसेच इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्र राज्यमध्ये देखील ३ वर्षे सेवा देवू केलेले होमगार्ड सैनिकांना पोलीस विभाग,वन विभाग किंवा इतर शासकीय प्रशासकीय विभागात ५० % आरक्षणसह भरती प्रक्रियेत विशेष सवलत देवूनी सरळ भरती वा नेमणूक करण्यात यावी या इतर मागण्याकरिता जिल्हाध्यक्ष महेंद्रभाऊ पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडे वेळोवेळी मागणी करून देखील अद्यापपावेतो त्यांच्या मागण्या मान्य करण्यात आल्या नसल्यामुळे आज दि.२६ जानेवारी २४ शुक्रवार रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात करीत असून मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरु ठेवण्यात येणार आहे तसेच दि.२८ जानेवारी २४ रविवार पासून पाणी त्याग आंदोलन सुरु करून आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असे जिल्हाध्यक्ष महेंद्रभाऊ पाटील यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.