यावल-पोलीस नायक (प्रतिनीधी) :-
दि.१६ फेब्रुवारी २४ शुक्रवार
तालुक्यातील किनगाव येथील किनगाव-डोणगाव रोडवरील इंग्लिश मीडियम निवासी पब्लिक स्कूल येथील क्रीडा शिक्षक व तालुका क्रीडा समन्वयक दिलीप बिहारी संगेले यांना नुकताच सन २०२३-२४ या वर्षाचा महाराष्ट्र राज्य समता शिक्षक परिषद जळगाव यांचेतर्फे नुकताच जिल्हास्तरीय महात्मा जोतीराव फुले गुणवंत शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
पी.एन.लुंकड विद्यालय जळगाव येथे शिक्षक आमदार किशोरजी दराडे व डॉ.झोपे यांच्या हस्ते वितरीत करण्यात आलेला हा पुरस्कार दिलीप संगेले हे राज्यस्तरीय स्पर्धेसाठी सांगली येथे असल्याने प्राचार्य अशोक प्रतापसिंग पाटील यांनी नुकताच स्वीकारला.दिलीप बिहारी संगेले हे क्रीडा क्षेत्रात उत्तम प्रकारे कर्तव्य बजावत असल्याने त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.संगेले यांनी सामाजिक,शैक्षणिक व प्रशासकीय क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत महाराष्ट्र राज्य समता शिक्षक परिषद जळगाव यांच्यातर्फे २८ नोव्हेंबर राष्ट्रपिता ज्योतिराव फुले स्मृती दिनाचे औचीत्य साधुन गुणवंत शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.दिलीप संगेले यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल इंग्लिश मीडियम निवासी पब्लिक स्कूलचे चेअरमन विजयकुमार देवचंद पाटील,व्हा.चेअरमन शैलेजाताई विजयकुमार पाटील,सचिव मनीष विजयकुमार पाटील,संचालीका पूनम मनीष पाटील,प्राचार्य अशोक प्रतापसिंग पाटील,उप प्राचार्या राजश्री सुभाष अहिरराव व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी कौतुक करत अभिनंदन केले आहे.