Just another WordPress site

“अन्यथा मी इथून पुढे धुवून काढेन,कोणालाही सोडणार नाही”-नारायण राणे यांच्या टीकेला मनोज जरांगेंचे प्रतिउत्तर

मनोज जरांगे पाटील म्हणाले,माझा नारायण राणे यांना प्रश्न आहे की,तुम्ही तर पूर्वी मराठा-मराठा करून छाती बडवत होता मग आता तुम्हाला काय झालय.मी मराठ्यांसाठी बोलतोय त्यामुळे तुम्ही माझ्या बाजून बोलायला हवे होते तसेच मी तुम्हाला कधी काही बोललो नाही,तुमच्याबद्दल चकार शब्द काढला नाही मग तुम्ही कोणाची री ओढताय? मोदींना ओबीसी असल्याचा अभिमान आहे तसाच मला मराठ्यांचा अभिमान आहे.उगाच काहीही बोलायला तुम्ही एकटेच तीनसिंगराव लागून गेलात का?मनोज जरांगे नारायण राणे यांना उद्देशून म्हणाले,मला काही मर्यादा असल्याने मी शांत आहे.मी माझ्या मर्यादा पळतोय.मी तुम्हाला आजवर मानत होतो,आताही मानतो म्हणूनच मी कधी तुम्हाला काही बोललो नाही त्यामुळे माझी तुम्हाला शेवटची विनंती आहे तसेच माझी निलेश राणे यांना विनंती आहे की,नारायण राणे यांना समजावा कारण पुढच्या वेळी मी त्यांना सोडत नसतो.माझ्यापुढे कोण आहे हे मी बघणारच नाही.कोण आहे,काय आहे,किती मोठा माणूस आहे असले काही मी बघणार नाही.मी नारायण राणेंचा,त्यांच्या वयाचा आदर करतो.ते मोठे आहेत त्यामुळे त्यांच्या प्रतिमेला आमच्याकडून डाग लागणार नाही याची आम्ही काळजी घेतो.तुम्ही आमची भावना समजून घ्या अन्यथा मी त्यांचा पाणउतारा करेन.मराठा आंदोलक जरांगे पाटील म्हणाले,मी नारायण राणे यांना आतापर्यंत पाच वेळा इशारा दिला आहे परंतु ते काही ऐकत नाही.आता मी त्यांना शेवटची संधी देतोय तसेच मी मुद्दाम निलेश राणे यांना सांगतोय का तुम्ही तुमच्या वडिलांना सांगा,उद्या ते काही बोलले तर मी त्यांना सोडणार नाही.आत्ता एका तासाने बोलले तरी मी त्यांना सोडणार त्यांना खेटायचेच असेल तर माझीही तयारी आहे असे मनोज जरांगे पाटील यांनी नमूद केले आहे.
Leave A Reply

Your email address will not be published.