Just another WordPress site

यावल येथे महाशिवपुराण सप्ताहाची भक्तीमय वातावरणात समाप्ती

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.१ मार्च २४ शुक्रवार

येथील सुतारवाडा परिसरात भाविभक्तांच्या उपस्थितीत भक्तीमय वातावरणात सुरू असलेल्या शिव महापुराण सप्ताहाची पोथी वाचन व महाप्रसादाचे आयोजन करून करण्यात आली.

सुतारवाडा भागात शिव महापुराण सप्ताहा समाप्ती निमित्ताने भाविकांसाठी महाप्रसाद (भंडारा) कार्यक्रमाचे नवदुर्गा व सर्व मित्र मंडळाच्या वतीने आयोजन करण्यात आले.सात दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमात  अतिशय भक्ती भावाने मोठ्या संख्येने महिला व पुरुष भाविकांनी आपली उपस्थिती दिली.या कार्यक्रमाचे आयोजन नवदुर्ग दुर्ग मित्र मंडळ मंडळाचे पदाधिकारी चेतन अढळकर,बापू महाजन,ज्ञानेश्वर नन्नवरे,संजू पाटील,शिवाजी बारी,शशिकांत देवरे,नाना महाजन,बबलू बारी,शेखर बाविस्कर,किशोर नन्नवरे व कथेचे आयोजन पंडित कोळी यांच्याकडून करण्यात आले.प्रसंगी सुतारवाड्यातील व संभाजी पेठमधील मंडळातील कार्यकर्ते,पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.

Leave A Reply

Your email address will not be published.