“अरे घडफोडे तुम्ही.यांना घरफोडीचे लायसन्स देऊन टाका;तुमचे चिन्ह कमळ नको त्यापेक्षा हातोडी वगैरे ठेवा”
“दोन पक्ष फोडून पुन्हा आलो”, या देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्यावर उद्धव ठाकरेंचे उत्तर
हिंगोली-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.१८ मार्च २४ सोमवार
लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून देशात सात टप्प्यांमध्ये तर महाराष्ट्रात पाच टप्प्यांमध्ये निवडणूक होणार आहे.अशात प्रचार सभांचा धडाका सुरु झाला आहे.देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच एक वक्तव्य केले असून २०१९ च्या निवडणूक प्रचारात मी पुन्हा येईन हे त्यांचे वाक्य गाजले होते.सदरहू २०१९ ला ते घडू शकले नाही मात्र २०२२ मध्ये ते घडले असून दोन पक्ष फोडून मी पुन्हा आलो असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते त्यावर आता उद्धव ठाकरेंनी त्यांना उत्तर दिले आहे.
सत्ता आणि खुर्चीसाठी उद्धव यांनी आमच्या पाठीत खंजीर खुपसले असून ‘मी पुन्हा येईन’ असे म्हटले होते.२०१९ ला आम्ही (भाजपा-शिवसेना) निवडून आलो पण आमचे सरकार स्थापन झाले नाही त्यामुळे आम्हाला काहीजण अहंकारी म्हणाले हे तर राजकारणात सुरुच राहते असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.२०१९ च्या निवडणूक प्रचारात मी पुन्हा येईन ही देवेंद्र फडणवीस यांची घोषणा गाजली होती.त्यांनी विधानसभेच्या शेवटच्या दिवशी एक कविता म्हणून दाखवली होती त्यात या ओळी होत्या.२०१९ मध्ये जेव्हा महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले तेव्हापासून प्रत्येकानेच त्यांची या वाक्यावरुन यथेच्छ खिल्ली उडवली होती.शरद पवार,उद्धव ठाकरे,जयंत पाटील यांच्यासह अनेक नेत्यांनी देवेंद्र फडणवीस यांची खिल्ली उडवली ती याच वाक्यावरुन.मात्र देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत तुम्हाला सगळ्यांना माफ केले असे वक्तव्य शिंदे फडणवीस सरकार स्थापन झाल्यावर झालेल्या विशेष अधिवेशनात केले होते.तर दोन पक्ष फोडून मी पुन्हा आलो असे देवेंद्र फडणवीस रविवारी म्हणाले.आता याच वक्तव्यावर उद्धव ठाकरेंनी हिंगोलीतल्या सभेत उत्तर दिले आहे.
काही लोकांना अभिमान कसला असतो ? की आम्ही दोन पक्ष फोडून पुन्हा आलो.अरे घडफोडे तुम्ही.यांना घरफोडीचे लायसन्स देऊन टाका. हे घडफोडे आहेत.तुमचे चिन्ह कमळ नको त्यापेक्षा हातोडी वगैरे ठेवा कारण तुमच्या पक्षांत ना नेते तयार झाले,आदर्श तयार झाले नाहीत. नेत्यांचा आदर्श सोडाच आदर्शवाले नेते त्यांनी घेतले कारण विचार किंवा काही शिल्लकच नाही.गेल्या आठवड्यात सर्वोच्च न्यायालयाने मागच्या आठवड्यात निरीक्षण नोंदवले आहे.राष्ट्रवादीच्या बाबतीत.. शरद पवारांसारखा माणूस संपूर्ण राज्य पिंजून काढतो आहे.त्यांनी स्थापन केलेला पक्ष त्यांच्या पक्षाचे नाव चोरता आणि फोटोही चोरता ? इतकी बेशरम अवलाद कधी महाराष्ट्रात पाहिली नाही असेही उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे.भाजपा म्हणजे अधिकृतरित्या खंडणी गोळा करणारी टोळी झाली आहे.निवडणूक रोख्यांचा इतका हातोडा पडला आहे पण निर्ल्लजं सदासुखी अशी ही अवस्था आहे.माझ्या वडिलांचा म्हणजेच बाळासाहेबांचा फोटो लावण्यापेक्षा ईडी,सीबीआय आणि इन्कम टॅक्सचे फोटो दाखवा असाही टोला उद्धव ठाकरेंनी लगावला आहे.