Police Nayak
Just another WordPress site
Sign in

Welcome, Login to your account.

Forget password?
Sign in

Recover your password.

A password will be e-mailed to you.

  • Wednesday, March 18, 2026

Police Nayak Police Nayak - Just another WordPress site

  • Home
  • देश विदेश
  • जळगाव जिल्हा
  • जळगाव विशेष
  • ग्रामीण विशेष
  • अहमदनगर जिल्हा
  • धुळे जिल्हा
  • नंदुरबार जिल्हा
  • नाशिक जिल्हा
  • कृषी
  • क्राईम
  • खेळ
  • पारंपरिक
  • महाराष्ट्र
  • मुंबई विशेष
  • राजकीय
  • राज्य
  • राज्य सरकार विशेष
  • रेल्वे प्रशासन
  • रोजगार विषयक
  • वैचारिक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Police Nayak

“मला त्या पापात वाटेकरी व्हायचे नाही”, ठाकरे गटात प्रवेश करताच खासदार उन्मेश पाटलांचा भाजपावर गंभीर आरोप

राजकीय घडामोडी विशेष
By टीम पोलीस नायक On Apr 3, 2024 0

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-

दि.३ एप्रिल २४ बुधवार

जळगावचे विद्यमान खासदार उन्मेश पाटील यांनी आज दि.३ एप्रिल रोजी अधिकृतपणे शिवसेनेच्या ठाकरे गटात प्रवेश केला आहे.उन्मेश पाटील यांनी शिवसेना (उबाठा गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे,खासदार संजय राऊत,खासदार अरविंद सावंत यांच्या उपस्थितीत ठाकरे गटाची मशाल हाती घेतली.उन्मेश पाटलांचे ठाकरे गटात स्वागत करतांना राज्यसभेचे खासदार संजय राऊत म्हणाले,जळगावासह उत्तर महाराष्ट्रातले एक नेतृत्व आज आपल्या शिवसेनेत सहभागी होत आहे त्यांच्याबरोबर पारोळ्याचे नगराध्यक्ष करण पवार आणि असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते देखील आज शिवसेनेत दाखल झाले आहेत तसेच अनेक संघटनांचे पदाधिकारी त्यांच्याबरोबर शिवसेनेत प्रवेश करत आहेत.उन्मेश पाटील हे निष्ठावंत भाजपा कार्यकर्ते म्हणून ओळखले जात होते परंतु निष्ठावंतांच्या नशिबी नेहमीच संघर्ष असतो म्हणूनच ते निष्ठावंतांची कदर करणाऱ्या शिवसेनेत आले आहेत.उन्मेश पाटील यांच्या शिवसेनेत येण्याने शिवसेनेला उत्तर महाराष्ट्रात ताकद मिळेल.

पक्षप्रवेशावेळी खासदार उन्मेश पाटील म्हणाले,महाराष्ट्राचा स्वाभिमान जागृत ठेवत भारताला मराठी बाणा दाखवणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत आज मी प्रवेश करत आहे.मी भाजपा सोडून ठाकरे गटात प्रवेश करत असल्याने मला अनेकजण विचारत आहेत की उमेदवारी मिळाली नाही म्हणून तुम्ही नाराज आहात का ? मी या सर्वांना स्पष्टपणे सांगू इच्छितो की,राजकारण करतांना आमदार,खासदार होणे हे एवढेच माझे ध्येय नव्हते.मी खूप चांगल्या हेतूने काम करत होतो परंतु राजकारणात काम करतांना व आमदार असतांना आज आपण जी शासकीय योजनांची जत्रा पाहतोय त्याचा पॅटर्न आम्ही चाळीसगावात राबवला होता व दुर्दैवाने त्याला किंमत मिळाली नाही.मी मागणी न करता मला मागील वेळेस लोकसभा उमेदवारी मिळाली परंतु यावेळी मला एका भावाने दगा दिला तरी दुसरा भाऊ म्हणजे शिवसेना माझ्याबरोबर आहे आणि याचा मला आनंद आहे.खासदार पाटील म्हणाले,आम्हाला बदल्याचे नव्हे तर बदलाचे राजकारण हवे आहे.यात पद महत्वाचे नाही परंतु आमची अवहेलना करण्यात आली,मला मानसन्मान नको,कार्यकर्त्याची अवहेलना होते तेव्हा तो घुसमटतो.राज्यात विकासाऐवजी विनाशाची व  बदलाऐवजी बदल्याची भावना रुजवली जात आहे परंतु मला त्या पापातला वाटेकरी व्हायचे नाही.आमचा स्वाभिमान जपला जात नसेल बैठकीला बोलावले जात नसेल तर स्वाभिमान गहाण ठेवण्याऐवजी मी या लढाईत सहभागी व्हायचे ठरवले आहे.क्रांतीची मशाल पेटवायचे ठरवले आहे.मी शब्द देतो की,मी पदासाठी किंवा खासदार होण्यासाठी इथे (ठाकरे गट) आलो नाही.उद्धव ठाकरे यांनी मला सांगितले आहे की,जळगावात शिवसेनेचा कार्यकर्ता म्हणून काम करायचे आहे.माझ्यासह सर्व सहकारी जळगावात मशाल पेटवू.मला आणि माझ्या सर्व कार्यकर्त्यांना शिवसेनेने सामावून घेतले आहे त्याबद्दल मी उद्धव ठाकरेंचे आभार मानतो असे उन्मेश पाटील यांनी म्हटले आहे.

0
Share
टीम पोलीस नायक

Prev Post

यावल येथील डॉ.योगेश्र्वरी पाटील यांची वैद्यकीय परिक्षेत कौतुकास्पद कामगिरी

Next Post

“तुरुंगात टाकले तरी बेहत्‍तर,सर्वसामान्‍यांच्‍या प्रश्‍नांसाठी आम्‍ही आवाज उठवत राहणार”-आमदार बच्‍चू कडूंचा भाजपला जाहीर सभेत इशारा

You might also like More from author
राजकीय घडामोडी विशेष

सुनेत्रा पवार यांनी विलीनीकरणाचा निर्णय घेतला तर आम्हाला विलीनकरण करावेच लागेल !!…

राजकीय घडामोडी विशेष

“एकत्र यायचे असेल तर सत्तेतून बाहेर पडा” !! काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे…

राजकीय घडामोडी विशेष

काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचे संकेत देताच भाजपा नेत्याच्या घरावर भ्रष्टाचार प्रतिबंधक…

राजकीय घडामोडी विशेष

‘मातोश्रीवरील टीका करणे बंद करा तर मातोश्रीचे दरवाजे उघडतील’ !! महापालिका…

Prev Next
Leave A Reply
Cancel Reply

Your email address will not be published.

Recent Posts

  • देवकाते नगर अंधारातच !! डीपी जळण्याच्या मालिकेमुळे नागरिक संतप्त !!
  • यावल पूर्व वनपरिक्षेत्रात अवैध वृक्षतोडीचा आरोप !! चौकशी करण्याची पर्यावरण प्रेमी देवेंद्र वराडे यांची मागणी !!
  • यावल नगरपरिषदतर्फे मालमत्तांसाठी ‘अभय योजना’ व्याज व दंडावर १००% सूट !! नागरिकांनी संधीचा लाभ घ्यावा-नगराध्यक्ष छाया पाटील यांचे आवाहन
  • तीनहत्ती चौकात वाहतुकीचा बोजवारा !! राँग साईड व रस्त्यावर उभी वाहने आणि ट्रॅफिक पोलिसांच्या दुर्लक्षामुळे नागरिक हैराण !!
  • बारामतीतील सराईत गुन्हेगाराची थेट नागपूर कारागृहात रवानगी !! एमपीडीए कायद्यांतर्गत एक वर्षासाठी स्थानबद्ध !!

Recent Comments

  1. टीम पोलीस नायक on “शकुंतला तायडे महाराष्ट्राची हिरकणी पुरस्काराने सन्मानित”
  2. Digambar Tayade on “शकुंतला तायडे महाराष्ट्राची हिरकणी पुरस्काराने सन्मानित”
© 2026 - Police Nayak. All Rights Reserved.
Sign in
  • Home
  • देश विदेश
  • जळगाव जिल्हा
  • जळगाव विशेष
  • ग्रामीण विशेष
  • अहमदनगर जिल्हा
  • धुळे जिल्हा
  • नंदुरबार जिल्हा
  • नाशिक जिल्हा
  • कृषी
  • क्राईम
  • खेळ
  • पारंपरिक
  • महाराष्ट्र
  • मुंबई विशेष
  • राजकीय
  • राज्य
  • राज्य सरकार विशेष
  • रेल्वे प्रशासन
  • रोजगार विषयक
  • वैचारिक
  • शैक्षणिक
  • सामाजिक

Welcome, Login to your account.

Forget password?
Sign in

Recover your password.

A password will be e-mailed to you.