पंकजा मुंडेंना निवडणुकीत पाडा असे मी कुठेच बोललो नाही उलट त्याच जातीयवादी राजकारण करत आहेत.भरसभेत त्या म्हणतात आता ओबीसींनी एक होण्याची गरज आहे.त्याचवेळी स्टेजवर बसलेल्या मराठा आमदारांनी आक्षेप घेणे गरजेचे होते मात्र त्यांनी आक्षेप घेतला नाही त्यांना लाज वाटायला पाहिजे असे म्हणत जरांगेंनी बीडमधल्या राजकीय वातावरणाबाबत म्हटले आहे.चंद्रकांत पाटील यांना मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष का केले आहे ? त्यांना काय कळते.फक्त ‘तेरे नाम’ भांग पाडून हिंडत असतात पण स्वतःची ३७ मते तरी त्यांना पडतात का ? असे म्हणत मनोज जरांगेंनी चंद्रकांत पाटील यांची खिल्ली उडवली आहे.देवेंद्र फडणवीस यांनी म्हणावे एकनाथ शिंदे यांनी माझ्यावर हल्ला करायला लावला मी त्यांचे नाव लगेच घेणं बंद करतो.माझा एकच सवाल आहे व तो म्हणजे आमच्यावर गुन्हे कोणी दाखल केले ? एसआयटी आमच्या विरोधात का नेमली ? याचे उत्तर द्या असे सवाल जरांगेंनी उपस्थित केले आहेत.तसेच प्रमाणपत्र देण्यासंदर्भात आदेश असूनही देवेंद्र फडणवीस यांनी प्रमाणपत्र देऊ नका असे आदेश दिले आहेत.तुम्ही असे का करत आहात ? भाजपाच्या विरोधात आम्ही कधीच नव्हतो अन्यथा भाजपाचे १०६ आमदार निवडून आले नसते असे म्हणत जरांगेंनी थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना सवाल केला आहे व आता यावर देवेंद्र फडणवीस काही प्रतिक्रिया देणार का ? हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.