यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.८ जून २४ शनिवार
तालुक्यातील किनगाव परिसरात विनापरवाना अवैद्यरीत्या गौण खनिजची चोरटी वाहतूक करतांना तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांनी केलेल्या कारवाईत दोन ट्रॅक्टर वाळूसह जप्त करण्यात आलेले आहे.
या संदर्भात महसुल प्रशासनाच्या सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आज दि.८ जुन २०२४ शनिवार रोजी तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांच्या मार्गदर्शनाखाली यावल-चोपडा रोडवर किनगाव गावाजवळ यावल शहर तलाठी ईश्र्वर कोळी,डोंगर कठोरा तलाठी वसीम तडवी, कोळवद तलाठी राजु बोरटे,आडगाव तलाठी श्वेता ससाने,तहसीलदारांचे वाहनचालक अरविंद बोरसे यांच्या नेतृत्वातील गस्ती पथकाने गुप्त माहीती मिळाल्याच्या आधारावर धडक कारवाई करीत विनापरवाना अवैद्यरित्या वाळूची विना क्रमांकाच्या दोन ट्रॅक्टर मध्ये चोरटी वाहतुक करतांना आडळुन आले असुन तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांनी कारवाई करीत जप्त केली असुन दोघ वाहनांवर मोठी दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे वृत्त आहे.महसुल प्रशासनाने केलेल्या या वाळूमाफीया विरूद्धच्या धडक कारवाईमुळे वाळु माफीयामध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे.