यावल- पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.०१ मे २६ शुक्रवार
तालुक्यातील वड्री ग्रामपंचायतच्या महाराष्टू दिना निमित्ताने ध्वजारोहण करण्याचा बहूमान जिल्हा परिषदचे जेष्ठ सेवा निवृत धनंजय पाचपोळे यांना देण्यात आला .१ मे१९६० रोजी संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या संघर्षातून आणि मराठी भाषिकांच्या बलीदानातुन मुंबईसह स्वतंत्र महाराष्ट्र राज्य हे अस्तित्वात आले . स्वतंत्र महाराष्ट्र राज्य मिळवण्यासाठी ज्या१०६ जणांनी बलीदान दिलेल्या हूतात्म्यांना आदरांजली वाहण्यासाठी हा महाराष्ट्र दिन साजरा करण्यात येता.यावल तालुक्यातील सातपुडा पर्वताच्या रांगेत असलेल्या वड्री गावात ग्रामपंचायतच्या वतीने १ मे हा महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आला.यावेळी सरपंच अजय भालेराव व त्यांच्या सर्व सहकार्यानी महाराष्ट्र दिनाचे ध्वजारोहण करण्याचा बहुमान गावातील जेष्ठ सेवा निवृत्त शिक्षक धनंजय पाचपोळे ( गुरूजी ) यांना देण्यात आला व त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.याप्रसंगी सरपंच अजय भालेराव,उपसरपंच पंकज चौधरी,ग्रामसेवक आर एन तडवी,ग्राम पंचायत सदस्य व्ही पी चौधरी,सरदार तडवी,फकीरा तडवी,अकरम तडवी,सादिक तडवी यांच्यासह ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.