Just another WordPress site

यावल नगरपालिका क्षेत्रात प्रगनकांना जनगणना नोंदणीसाठी सहकार्य करा !! न पा नगराध्यक्ष व मुख्य अधिकारी यांचे आवाहन !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.२० मे २६ बुधवार

यावल नगरपालिका क्षेत्रात जनगणना २०२७ च्या पहिल्या टप्प्यास प्रारंभ झाला असून या मोहिमेसाठी यावल नगरपालिका प्रशासन सज्ज आहे.नगरपालिकेचे मुख्याधिकारी निशिकांत गवई यांच्या मार्गदर्शनाखाली जनगणना टीम यावल शहरात प्रत्यक्षात काम सुरू केले आहे.सदरचे काम १६ मे २६ पासून सुरू करण्यात आले असून हे काम १४ जून २६ या कालावधीपर्यंत राबवण्यात येणार आहे.

सदरहू शहरातील नागरिकांनी विविध माहिती संकलित करण्यासाठी प्रगणक म्हणून नियुक्ती करण्यात आलेल्या कर्मचाऱ्याला आपापल्या घरी आल्यानंतर माहिती पुरवावी व प्रशासनाला सहकार्य करावे.एखादी इसमाचे घर बंद असते यावेळी असे प्रगणक आमच्याकडे आलेले नाही अशा तक्रारी होतात त्यासाठी एखाद्याची जनगणना न झाल्यास किंवा नजरचुकीने राहिल्यास या कालावधीत नगरपालिकेत प्रत्यक्ष येऊन भेट द्यावी व जनगणना करून घ्यावी असे आवाहन नगरपालिका नगराध्यक्षा छाया पाटील व मुख्याधिकारी निशिकांत गवई यांनी केले आहे.

नगराध्यक्षांचे आवाहन

यावल नगरपरिषदेच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष छाया पाटील यांनी जनगणनेसाठी प्रगणकांना सहकार्य करावे व जनगणना हे आपल्या देशाचे भविष्य असून सर्व नागरिकांनी त्यात सहभाग नोंदवावा असे आवाहन नगराध्यक्षा छाया पाटील यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.