पूर्वी एक दादा कोंडकेंचा सिनेमा होता ‘बोट लावेन तिथे गुदगुल्या’ नाव घेतले तरीही आपल्याला हसायला येते.आता मोदींचा सिनेमा येतोय ‘हात लावेन तिथे सत्यानाश’.आपण क्रिकेटचा सामना हरला त्याचे कारणही मोदीच आहेत.हात लावेन तिथे सत्यानाश ही यांची गॅरंटी आहे.ये मेरी गॅरंटी आहे असे वर पुन्हा सांगतात.असल्या सडक्या गॅरंटी आपल्याला नको.एक कविता आहे बघा ‘सुनो द्रौपदी शस्त्र उठा लो’.आपल्या राष्ट्रपतींचे नावही योगायोगाने द्रौपदी आहे.आम्हाला आता तुमच्याकडूनच अपेक्षा आहेत.पंतप्रधान महाराष्ट्रात येत आहेत ज्यांना मणिपूरबद्दल बोलायला काळ गेला.आता ते बदलापूरबद्दल बोलतील की बंगालबद्दल ते बघावे लागेल असेही उद्धव ठाकरे म्हणाले.गणपती हे आपले प्रतीक आहे,तो विघ्नहर्ता आहे.तुमच्या रुपातून माझ्या भगिनीसाठी विघ्नहर्ता मदतीला धावून गेला पाहिजे.निधी मिळतो म्हणून तुमचा आत्मा विकू नका. गणपती बाप्पा पावतो म्हटले की मला काहीजण म्हणतात तुम्ही अंधश्रद्धा पाळता पण मला वाटते की गणपती पावतो.रक्तदान शिबीराच्या माध्यमातून आपला बाप्पा पावतो.मी श्रद्धा आणि अंधश्रद्धेत गफलत करत नाही.मी अंधश्रद्धाळू नाही.गणपती मंडळांनी चांगली कार्ये करत राहिली पाहिजे तुम्ही सगळे गणपतीचे दूत आहेत हे मी म्हटले तर काय चूक आहे असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.