Just another WordPress site

आता ८५ विमाने बॉम्बने उडवण्याची धमकी !! एअर इंडियाच्या २० तर अकासाच्या २५ विमानांचा समावेश !!

नवी दिल्ली-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-

दि.२४ ऑक्टोबर २४ गुरुवार 

देशात विमान कंपन्यांना येणाऱ्या धमक्या पाहून नेमके चालले तरी काय आहे ? असा प्रश्न कुणालाही पडेल कारण आता एक नाही दोन नाही ८५ विमाने बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे व यामध्ये इंडिगोची २० विमाने,एअर इंडियाची २०,विस्ताराची २० आणि अकासा एअरलाइन्सची २५ अशी ८५ विमाने उडवून देण्यात येतील अशी धमकी देण्यात आली आहे.दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मागच्या आठ दिवसात ९० हून अधिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विमाने बॉम्बने उडवण्याची धमकी आली आहे.यानंतर दिल्ली पोलीस अलर्ट मोडवर आहेत.अकासा,एअर इंडिया,इंडिगो,विस्तारा या विमान कंपनीची विमाने बॉम्बने उडवू अशी धमकी देण्यात आली आहे.या धमकी प्रकरणात आत्तापर्यंत आठ वेगवेगळ्या FIR दाखल करण्यात आल्या आहेत.दिल्लीहून देशातल्या विविध ठिकाणी जाणाऱ्या आणि आंतरराष्ट्रीय विमानांना ही धमकी देण्यात आली आहे.इंडिया टुडेने हे वृत्त दिले आहे.

एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार धमक्यांचे हे संदेश सुरुवातीला एक्स या मायक्रोब्लॉगिंग साईटवर देण्यात आले.ते सुरुवातीला तपास अधिकाऱ्यांनी फेटाळले.यातले पहिले प्रकरण १६ ऑक्टोबरला समोर आले होते मात्र आता ८५ विमाने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे त्यामुळे तपास यंत्रणा अलर्ट मोडवर आहेत.१६ ऑक्टोबरला अकासा एअरलाइनचे विमान हे बॉम्बने उडवण्यात येईल अशी धमकी एक्सवरुन देण्यात आली होती.१८० प्रवासी या विमानात बसले होते.ही धमकी आल्यानंतर हे विमान पुन्हा दिल्ली विमानतळावर उतरवण्यात आले होते तसेच पोलिसांनी एक्सकडे पत्र लिहून ही धमकी कुठल्या अकाऊंटवरुन आली त्याचे तपशील मागितले होते.दिल्ली पोलिसांचा साबयर सेल विभाग सध्या या प्रकारच्या घटनांवर लक्ष ठेवून आहे.एक्स आणि सोशल मीडियाचा वापर करुन विमाने उडवण्याच्या धमक्या देण्यात येत आहेत.एका आठवड्यात १७० हून अधिक विमाने उडवू व त्या विमानांमध्ये स्फोट करु अशा धमक्या आल्या आहेत.एखाद्या एक्स अकाऊंटवरुन धमक्या येत तर नाहीत ना ? याकडे डोळ्यांत तेल घालून सायबर सेल विभाग लक्ष देत आहे.या धमक्या का देण्यात येत आहेत ? कुणाकडून देण्यात येत आहेत याचे तपशील अद्याप समजू शकलेले नाहीत.

Leave A Reply

Your email address will not be published.