पतीने मोड आलेले हरभरे खाल्ले नाहीत या कारणावरून पत्नीची पतीला लाटण्याने मारहाण !! करंगळीचा चावा घेऊन केली दुखापत !! पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल !!
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,पत्नीने पतीसाठी हरभरे भिजवले होते.रविवारी (१ डिसेंबर) भिजवलेले हरभरे न खाल्ल्याने दोघांमध्ये वाद झाले व त्यानंतर पत्नीने पतीला लाटण्याने मारहाण केली तसेच त्याच्या डोक्यात लाटणे मारले.लाटण्याचा मारापासून वाचण्यासाठी पतीने दोन्ही हात वर केले तेव्हा पत्नीने त्याच्या डोक्यात मिक्सरचे भांडे घातले त्यानंतर पत्नीने पतीच्या करंगळीचा चावा घेऊन नख तोडले.मारहाणीत जखमी झालेल्या पतीने समर्थ पोलीस ठाण्यात धाव घेतली.वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गित्ते यांनी घटनास्थळी भेट दिली.सदरहू गंभीर दुखापत केल्याप्रकरणी ४० वर्षीय पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून हवालदार परीट तपास करत आहेत.