Just another WordPress site

सातपुडा निवासनी श्रीक्षेत्र मनुदेवी देवस्थानाचे केन्द्रीय क्रीडामंत्री रक्षाताई खडसे यांनी घेतले दर्शन !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.२२ जानेवारी २५ बुधवार

केंद्रिय क्रीडा मंत्री रक्षाताई खडसे यांनी काल दि.२१‌ रोजी सातपुडा निवासिनी श्रीक्षेत्र मनुदेवी देवस्थानाला भेट देऊन तिर्थक्षेत्र परीसराची पाहणी केली.यावेळी त्यांच्या सोबत भाजप तालुका अध्यक्ष उमेश फेगडे,यावल कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक उज्जैनसिंग राजपुत,यावल पंचायत समीती माजी सदस्य दिपक पाटील,डांभुर्णी येथील पुरोजित चौधरी,जयश्रीताई चौधरी,यावल कृषी उत्पन्न बाजार समिती संचालिका कांचनताई फालक,कमलाकर पाटील,तुषार राणे,किनगाव येथील राहुल पाटील,अनिल पाटील,आर.ई.पाटील,आडगाव येथील मनोज पाटील,विश्वजित पाटील,मनुदेवी संस्थेचे अध्यक्ष शांताराम पाटील,उपाध्यक्ष शिवाजी पाटील,मनुदेवी संस्थेचे विश्वस्त कर्मचारी व कासारखेडा येथील माजी सरपंच भागवत पाटील यांच्या सह असंख्य भाजपाचे सदस्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चिंचोली येथे सत्कार प्रसंगी केंद्रिय क्रीडामंत्री रक्षाताई खडसे यांनी प्रथमच श्रीक्षेत्र मनुदेवी मंदिरावर भेट दिली.यावेळी चिंचोली जवळ मनुदेवी चौफुलीवर रक्षाताई खडसे यांचा यावल प.स.चे माजी उपसभापती गोकुळ पाटील व माजी जिल्हा परिषद सदस्य सुभाष सोळुंके यांच्या वतीने शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.तसेच
किनगाव यात्रोत्सव निमित्त भवानी मातेच्या मंदिरात दर्शन किनगाव वाशियांचे ग्रामदैवत आई भवानी मातेचा काल दि.२१ रोजी यात्रोत्सव साजरा केला जात होता त्या निमित्ताने रक्षाताई खडसे यांनी मंदिरात जाऊन भवानी मातेचे दर्शन ही घेतले.दरम्यान महिला सक्षमीकरण व महिला उपजिविका स्वतः निर्माण करणे ही संकल्पना सुरू करून किनगाव येथील गौरी शक्ती महिला बचत गटांच्या महिला सदस्यांनी एक नवीन उपक्रम सुरू केला आहे.त्यांच्या या उपक्रमाला केंद्रीय क्रीडामंत्री रक्षाताई खडसे यांनी भेट देऊन उपस्थित महिला बचत गटांच्या महिलांशी संवाद साधुन बचत गटातील सदस्यांना केंद्र शासन व राज्य शासनाच्या माध्यमातून जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली.यावेळी ही किनगाव येथील असंख्य महिला सदस्य उपस्थित होत्या.

Leave A Reply

Your email address will not be published.