यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.१२ फेब्रुवारी २५ बुधवार
तालुक्यातील डोंगर कठोरा येथे श्री विठ्ठल मंदिर पंचवटी यांच्या वतीने श्रीमद रामायण कथा व अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह सोहळ्याचे दि.१० फेब्रुवारी ते १७ फेब्रुवारी २५ या कालावधीत आयोजन करण्यात आले असून या सप्ताह सोहळ्याची ह.भ.प.सौ.सीमाताई नेहेते भुसावळ व ह.भ.प.श्री.राकेश महाराज डोंगर कठोरा यांच्या कीर्तनाने सुरुवात करण्यात आलेली आहे.
सदरील सप्ताहादरम्यान सकाळी ५ ते ६ काकडा आरती व हरिपाठ,सकाळी ७ ते ८ विष्णू सहस्र नाम,सकाळी ८ ते ११ व दुपारी २ ते ५ कथा वाचन तसेच रात्री ८ ते १० कीर्तनाचा कार्यक्रम राहील.यात आज दि.१२ फेब्रुवारी रोजी ह.भ.प.श्री.संजय महाराज चितोडा,दि.१३ फेब्रुवारी रोजी ह.भ.प.श्री.सुभाष महाराज भालोद,दि.१४ फेब्रुवारी रोजी ह.भ.प.श्री.मुकुंदा महाराज आसोदा,दि.१५ फेब्रुवारी ह.भ.प.खुशाल महाराज डोंगर कठोरा यांच्या कीर्तनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.दरम्यान दि.१७ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ ते २ महाप्रसाद व या महाप्रसादाचे यजमान ह.भ.प.श्री.भगवान शालीग्राम पाटील मुंबई हे असून संध्याकाळी ५ ते ७ याकालावधीत दिंडी सोहळा,रात्री ७ ते ८ भारुडे व रात्री ८ ते १० ह.भ.प.श्री.भरत महाराज बेडीकर यांचे काल्याचे कीर्तन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे.सदरील सप्ताहास कीर्तन यजमान दिनकर पाटील,मोहित राणे हिंगोणा,गौरव पाटील चिनावल,चंद्रकांत भिरूड,प्रवीण गाजरे,सुदाम राणे,हिरालाल जावळे,जीवन धनगर,इच्छाराम बाऊस्कर,सुनील झांबरे,रवींद्र चौधरी बोरखेडा,विमलबाई भीरुड,सुनील बाऊस्कर यांच्यासह संमिश्र मित्र मंडळ,गढीवरील श्री विठ्ठल मंदिर,श्री स्वामिनारायण मंदिर,श्री महादेव मारुती मंदिर तरुण मंडळ व समस्त गावकरी मंडळी डोंगर कठोरा यांचे सहकार्य लाभणार आहे.तरी भाविक भक्तांनी या श्रीमद रामायण कथा व अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह सोहळ्याचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री विठ्ठल मंदिर पंचवटी यांच्या वतीने करण्यात आले आहे.