पुणे-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२६ फेब्रुवारी २५ बुधवार
गावी निघालेल्या तरुणीवर शिवशाही बसमध्ये बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून आज बुधवारी सकाळी साडेपाचच्या सुमारास ही घटना घडली आहे.पोलिसांनी आरोपीचे नाव निष्पन्न केले असून त्याचा शोध घेण्यास पोलिसांची आठ पथके रवाना झाली आहेत.दत्तात्रय रामदास गाडे असे या प्रकरणातल्या आरोपीचे नाव असून ही घटना नेमकी कशी घडली हा सगळा घटनाक्रम उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी सांगितला आहे.“पीडित मुलगी पुण्यात काम करते.ती सातारा या ठिकाणी तिच्या गावी चालली होती.सकाळी साधारण पावणेसहाच्या सुमारास ती बसची वाट बघत होती त्यावेळी आरोपी तिकडे गेला होता.आरोपी तिच्याशी बोलला असेही दिसते आहे आणि त्यानंतर तिच्या शेजारचा माणूस उठून निघून गेला हेदेखील दिसते आहे.आरोपीने गोड बोलून तिच्याशी ओळख करुन घेतली आणि कुठे जाते आहेस असे विचारले त्यावर मुलीने फलटणला जायचे आहे.तर त्याने तिला सांगितले बस इथे नाही तर दुसऱ्या ठिकाणी लागते.चल मी तुला बसजवळ घेऊन जातो.सीसीटीव्ही फुटेजमध्ये ती मुलगी आरोपीसह बसजवळ जाताना दिसते आहे.” अशी माहिती स्मार्तना पाटील यांनी दिली.
बसमध्ये अंधार होता त्याचा फायदा घेऊनच आरोपीने दुष्कृत्य केले-पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील !!
स्मार्तना पाटील पुढे म्हणाल्या,बसमध्ये अंधार होता त्यावर ती आरोपीला म्हणाली की या बसमध्ये तर अंधार आहे तर आरोपी तिला म्हणाला ही बस रात्री आली आहे. लोक झोपले असतील म्हणून अंधार आहे तुला हवे तर तू चेक कर.तिला बसमध्ये जायला सांगितले.सदर मुलगी अंधार का आहे हे बघायला आतमध्ये गेली तेव्हा आरोपी तिच्या मागोमाग बसमध्ये शिरला त्याने बसचा दरवाजा लॉक केला आणि त्यानंतर तिच्यावर बलात्कार केला त्यानंतर आरोपी उतरुन गेल्याचेही सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसते आहे तसेच मुलगीही उतरली आणि बसने गावी जायला निघाली होती.दरम्यान अर्ध्या रस्त्यात गेल्यानंतर तिने हा सगळा प्रकार मित्राला सांगितला.मित्राने तिला सांगितल्यानंतर ती आमच्याकडे म्हणजेच पोलीस ठाण्यात आली.तिच्या तक्रारीनंतर आम्ही सीसीटीव्ही फुटेज तपासले.आरोपी हा शिरुर गावातला आहे असे कळले आहे व त्याची ओळख पटली असून त्याला शोधण्यासाठी आठ पथके रवाना झाली आहेत.डॉग स्क्वॉडही शोध घेतो आहे असे स्मार्तना पाटील यांनी म्हटले आहे.