यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.०४ मार्च २५ मंगळवार
येथील डॉ.श्री.अप्पासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्या सौजन्याने यावल शहरात स्वच्छता मोहीम अभियान अंतर्गत रविवार दि.०२ मार्च २५ रोजी सकाळी साडेआठ ते अकरा या कालावधीत प्रमुख सरकारी कार्यालय व यावल शहरातील मेन गल्ली येथील कचरा संकलित करून स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.दरम्यान मोहिमेमध्ये तालुकाभरातून २५६ श्री सदस्यांनी स्वच्छता अभियानात सहभाग नोंदवला.यावेळी तालुक्यातून १२ ट्रॅक्टरद्वारे हा कचरा नगरपरिषदेच्या कचरा डेपोवर संकलित करण्यात आला.यावेळी शहरात सुका कचरा १०१.३० क्विंटल व ओला कचरा ४५.४५ क्विंटल असा एकूण कचरा १४२.७५ क्विंटल कचरा जमा करण्यात आला.यामुळे यावल शहर नगर परिषदच्या क्षेत्रातील व शासकीय कार्यालय चकचकाट झाल्याचे पाहायला मिळाले.
दरम्यान स्वच्छता दूत पद्मश्री महाराष्ट्रभूषण स्वर्गीय डॉ.आप्पासाहेब तथा दत्तात्रय नारायण धर्माधिकारी व डॉ.सचिन धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम महाराष्ट्र भूषण डॉ.श्री नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त यावल शहरातील सरकारी कार्यालय व प्रमुख रस्ते यांची स्वच्छता अभियान करून राबविण्यात आले.याप्रसंगी रावेर विधानसभा क्षेत्राचे आमदार अमोल हरिभाऊ जावळे यांनी सुद्धा या ठिकाणी हजेरी लावून श्री सदस्यांचे मनोबल वाढवून स्वतः साफसफाईमध्ये सहभाग नोंदवला.प्रसंगी आ.अमोल जावळे यांनी श्री.सदस्यांशी हितगुज करून आपल्या काही अडचणी असतील तर त्या सोडवण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे त्यांनी यावेळी आश्वासन दिले.