Just another WordPress site

बिबट्याच्या अफवांवर विश्वास न ठेवता दक्षता बाळगण्याबाबत वन विभागाचे आवाहन !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.१५ मार्च २५ शनिवार

तालुक्यातील साकळी शिवारात एका बिबट्याने सात वर्षाच्या मुलाचा बळी घेतल्यानंतर तालुक्यात बिबट विषयी परिसरात सर्वसामान्य नागरीकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.दरम्यान बिबट्या शोध कार्यासाठी वन विभागाच्या वतीने तिन पथक निर्माण करण्यात आले असून सद्य परिस्थितीला बिबट्याचा शोध घेण्यासाठी सदरील पथकांच्या वतीने युद्धपातळीवर शोधकार्य सुरू आहे व असे असतांना देखील काही नागरीकांकडून बिबट्या दिसल्याची अफवा पसरवली जात असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत आहे.परिणामी अशा या अफवांमुळे वनविभाग व परिसरातील नागरीकांना याचा त्रास होत असल्याची माहिती पश्चीम वन विभाग क्षेत्राचे वनपरिक्षेत्र अधिकारी सुनिल भिलावे यांनी नुकतीच दिली आहे.

दरम्यान तालुक्यातील साकळी येथील सरपंच दीपक नागो पाटील यांनी दिलेल्या माहीतीवरून साकळी शिवारात मीरा सैय्यद यांच्या शेतात सलदार रमेश शंकर तेली यांनी सांगितल्या ठिकाणी तात्काळ जाऊन बिबटचा शोध घेणाऱ्या पथकाने पाहणी केली असता कोणत्याही प्रकारच्या बिबटयाच्या पाऊल खुणा किंवा ठसे आढळून आले नाही.परिणामी ग्रामस्थांनी अशी चुकीची माहिती व अफवा पसरू नये तसेच बिबट्या दिसुन आल्यास आपल्या कडील मोबाइलवरून बिबट्याचे व्हीडीओ किंवा फोटो वन विभागाकडे त्वरीत पाठवावे व शक्य असल्यास तात्काळ स्वतःचा जिव धोक्यात न घालता काळजीपुर्वक सुरक्षीत ठिकाणी आसरा घ्यावा असे आवाहन वन विभाग पश्चिम क्षेत्र वनपरिक्षेत्र अधिकारी सुनिल भिलावे यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.