यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.१७ मार्च २५ सोमवार
तालुक्यातील दहिगाव येथे राहणाऱ्या तरूणाने विहिरीत उडी घेत आपली जिवनयात्रा संपवली असून संपुर्ण गाव व परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली असून यावल पोलीस पुढील तपास करीत आहे.
या संदर्भात पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहीती अशी की,तालुक्यातील दहिगाव येथील बसस्थानक परिसरात चहा विक्रीचा व्यवसाय करणारा तरूण सोमानंद उर्फ सोनु कमलाकर पाटील वय २३ वर्ष याने गाव शिवारात असलेल्या किरण मधुकर नेवे यांच्या शेतातील विहीरीत उडी घेत आत्महत्या केल्याचे दि.१५ मार्च रोजी उघडकीस आले आहे.दरम्यान आत्महत्या करण्याआधी त्याने मी आत्महत्या करणार असल्याचे आपल्या मित्रांना सांगीतले होते मात्र मित्रांनी त्याच्या बोलण्यावर दुर्लक्ष केले व काही वेळेतच तरूणाने मोठया प्रमाणावर जलसाठा असलेल्या विहीरीत आत्महत्या केली.सदरच्या विहिरीत जलसाठा मोठया प्रमाणावर असल्याने मयताचा मृतदेह विहीरीतुन काढतांना अनेक अडचणी निर्माण झाल्या.सोमानंद पाटील या तरूणाने आत्महत्या सारखे पाऊल का उचलले हे मात्र स्पष्ट होऊ शकले नाही.याबाबत यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली असून पुढील तपास यावलचे पोलीस निरिक्षक प्रदीप ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहेत.