Just another WordPress site

राजोरा येथील श्रीराम क्रिकेट लीग स्पर्धेचे आमदार अमोल जावळे यांच्या हस्ते बक्षीस वितरण !!

सुरज सपकाळे,पोलीस नायक

पाडळसा ता.यावल (प्रतिनिधी) :-

दि.१७ मार्च २५ सोमवार

तालुक्यातील राजोरा श्रीराम क्रिकेट लीगच्या वतीने संपन्न झालेल्या क्रिकेट स्पर्धत कासवा येथील शिवशक्ती क्रिकेट संघाने विजेतेपद मिळविले तर राजोरा येथील श्रीराम क्रिकेट संघाला उपविजेते पदावर समाधान मानावे लागले.यात यावल रावेर तालुक्याचे आमदार अमोल हरिभाऊ जावळे यांच्या प्रमुख उपस्थितीत सदरील विजयी संघांच्या पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम नुकताच पार पडला.

आमदार अमोल जावळे यांच्याकडून विजेतेपदाचा चषक स्वीकारतांना शिवशक्ती टीम कर्णधार संदीप सपकाळे (छाया-सुरज सपकाळे)

सदर स्पर्धचे आयोजन भारतीय जनता युवा मोर्चाचे यावल तालुकाध्यक्ष सागर कोळी व यावल कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती नितीन व्यंकट चौधरी यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजन करण्यात आले.या स्पर्धत विविध संघात साखळी पद्धतीने एकूण ३५ सामने खेळवण्यात आले त्यापैकी अंतिम सामन्यांमध्ये कासवा येथील शिवशक्ती क्रिकेट टीम व राजोरा येथील श्रीराम क्रिकेट टीम अशा दोन संघांमध्ये अंतिम सामना खेळवण्यात आला.सदर सामना अतिशय चुरशीचा झाला व त्यामध्ये कासवा येथील संघाने विजेतेपद राखले तर उपविजेते पद राजोरा येथील श्रीराम संघाने राखले.अंतिम सामन्याच्या वेळी आयोजक सागर कोळी,नितीन व्यंकट चौधरी, सांगवी खुर्द येथील दिगंबर कोळी,आकाश धनगर,संजय धनगर,सुधाकर कोळी,राजोरा येथील मधुकर नारखेडे,कल्पेश पाटील,चेतन पाटील,बापू कोळी यांचेसह भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.सदर बक्षीस वितरणामध्ये रावेर यावल विधानसभा क्षेत्राचे आमदार अमोल जावळे यांनी विजयी संघाचे कौतुक केले व त्यांना स्मृती चिन्ह व रोख रकमेचे बक्षीस दिले गेले व खेळाडू वृत्ती जोपासण्यासाठी त्यांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचेही आश्वासन दिले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शक्तिकेंद्र प्रमुख मयूर महाजन यांनी केले तर संपूर्ण स्पर्धा यशस्वी करण्यासाठी ज्ञानेश्वर उंबरकर व विशाल कोळी यांनी परिश्रम घेतले.

Leave A Reply

Your email address will not be published.