जावेद शेख,पोलीस नायक
भडगाव तालुका (प्रतिनिधी) :-
दि.१९ मार्च २५ बुधवार
भडगाव शहरातील मेनरोड वरील घोडके सराफ या ज्वेलरीच्या दुकानाची मागील भिंत तोडून अज्ञात चोरट्यांनी सहा किलो चांदी व रोख रक्कम चोरून नेल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे.याबाबत भडगावातील मेन रोडवर व भर चौकातील दुकान चोरट्यांनी फोडल्याने पोलीसचा धाक संपला की काय ? असा सवाल शहर वासियांकडून उपस्थित करण्यात येत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,शहरातील मेन रोडवरील घोडके सराफ हे दुकान मालक बाहेर गावी गेल्याने दोन दिवसांपासून बंद होते.दरम्यान या दुकानाची मागची भिंत अज्ञात चोरट्यांनी तोडून दुकानामध्ये प्रवेश करत सहा किलो चांदी व रोख रक्कम अशी लाखो रुपयाची चोरी चोरट्यांनी केली व ते पसार झाले.ही घटना काल सकाळी उघडकीस आली.याप्रकरणी भडगाव पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दरम्यान शहराच्या मध्यवर्ती भागातच धाडसी चोरी घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.गेल्या काही दिवसांपासून गिरणा नदी पात्रातून सुरू असलेला वाळू उपसा,वाढती चोरी आणि पोलिसांची निष्क्रियता यामुळे कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे व आता शहरातील मध्यवर्ती भागातील चोरी प्रकरण यामुळे भडगाव पोलिसांसमोर चोरांचा शोध घेण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे.या घटनेने शहरातील व्यापारी आणि नागरिक अस्वस्थ झाले असून पोलिस प्रशासनाने तातडीने कारवाई करावी अशी मागणी व्यापारीवर्ग व शहरवासियांकडून केली जात आहे.