Police Nayak
Just another WordPress site
Sign in

Welcome, Login to your account.

Forget password?
Sign in

Recover your password.

A password will be e-mailed to you.

  • Thursday, August 13, 2026

Police Nayak Police Nayak - Just another WordPress site

  • Home
  • देश विदेश
  • जळगाव जिल्हा
  • जळगाव विशेष
  • ग्रामीण विशेष
  • अहमदनगर जिल्हा
  • धुळे जिल्हा
  • नंदुरबार जिल्हा
  • नाशिक जिल्हा
  • कृषी
  • क्राईम
  • खेळ
  • पारंपरिक
  • महाराष्ट्र
  • मुंबई विशेष
  • राजकीय
  • राज्य
  • राज्य सरकार विशेष
  • रेल्वे प्रशासन
  • रोजगार विषयक
  • वैचारिक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Police Nayak

“…तर वक्फ विधेयक कचरा कुंडीत फेकून देऊ” !! वक्फ बोर्ड सुधारणा विधेयका वरून तेजस्वी यादव यांचा जोरदार हल्लाबोल !!

देश घडामोडी विशेष
By टीम पोलीस नायक Last updated Apr 6, 2025 0

बिहार-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-

दि.०६ एप्रिल २५ रविवार

वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक लोकसभेत आणि राज्यसभेत मंजूर झाले असून आता या विधेयकाचे रुपांतर कायद्यात केले जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मान्यता दिल्यानंतर या विधेयकाचे रुपांतर कायद्यात केले जाईल.दरम्यान राजदचे नेते तेजस्वी यादव यांनी वक्फ विधेयक आम्ही कचरापेटीत फेकू असे म्हटले आहे तसेच आम्ही या विरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतल्याचेही त्यांनी सांगितले आहे.संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात केंद्र सरकारकडून वक्फ दुरुस्ती विधेयक मांडण्यात आले होते व विरोधी पक्षांच्या विरोधानंतरही हे विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहात मंजूर झाले.यानंतर विरोधी पक्षांतील काही खासदारांनी या विधेयका विरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.वक्फ दुरुस्ती विधेयक लोकसभेत २८८ विरुद्ध २३२ मतांनी मंजूर झाले होते तर राज्यसभेत या विधेयकाच्या बाजूने १२८ मते तर विरोधात ९५ मते पडली.

दरम्यान राजदचे नेते तेजस्वी यादव यांनी पत्रकारांना संबोधित करतांना म्हटले की,आरक्षणाचा लढा लढण्यासाठी आम्ही मागासवर्गीय आणि दलित यांच्यासाठी आम्ही सक्रय झालो होतो.भाजपाने आल्यानंतर आरक्षणाचा लढा थांबवण्यासाचे प्रयत्न केले त्यासाठी कट रचले.आता आम्ही वक्फ सुधारणा विधेयकाविरोधातही आवाज उठवत आहोत.आम्ही या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे तसेच तुम्हाला शब्द देतो की बिहारमध्ये आमची सत्ता आली तर हे विधेयक आम्ही कचराकुंडीत फेकून देऊ असे म्हटले आहे.तेजस्वी यादव पुढे म्हणाले,मी हिंदू बांधवांना सांगू इच्छितो की केंद्र सरकारला असे मुळीच वाटत नाही की दलित,मागासवर्गीय आणि अतिमागास लोक हे समाजाच्या मुख्य प्रवासहाशी जोडले गेले पाहिजेत व या लोकांनी ६५ टक्के आरक्षणात खोडा घालण्याचे काम केले.आम्हाला या सरकारचे धोरण चांगलेच माहीत आहे.आता मुस्लिमानंतर हे लोक शीख बांधव,ख्रिश्चन बांधवांच्या जमिनींवरही कब्जा करतील.एवढेच काय हिंदूंच्या जमिनी बळकावण्यासाठी सरसावतील.ज्या लोकांनी या विधेयकाचे समर्थन केले आहे त्यांना निवडणुकीत परिणाम भोगावे लागतील असेही तेजस्वी यादव यांनी म्हटले आहे.

मुंगेरमध्ये उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांना अधिकारी मटण खाऊ घालत होते.नितीश कुमार यांचा फोटो आता हटवला जाऊन तिथे मोदींचा फोटो लावण्यात येतो आहे. भाजपाचे लोक कसेबसे निवडणुकीपर्यंत नितीशकुमारांना बरोबर ठेवतील.एकदा निवडणूक झाली आणि निकाल लागला की काय घडणार आहे हे सगळ्यांनाच माहीत आहे.वक्फची एवढी मोठी चर्चा संसदेत झाली असा एक नेता दाखवा जो वक्फबाबत बोलला नाही मात्र आमचे मुख्यमंत्री नितीश कुमार असे आहेत ज्यांनी वक्फबाबत चकार शब्दही काढला नाही.वक्फसाठी आम्ही संसदेत विरोध दर्शवला आता आम्ही सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे.न्यायालयात आणि रस्त्यावर आमचा वक्फ विरोधी लढा सुरुच राहिल असेही तेजस्वी यादव यांनी म्हटले आहे.

0
Share
टीम पोलीस नायक

Prev Post

वैद्यकीय अधिकारी डॉ.फिरोज तडवी यांचे अल्पशा आजाराने निधन !!

Next Post

लग्न होण्याआधीच तुटली आयुष्याची दोरी !! रोलर कोस्टरचा स्टँड तुटल्याने तरुणीचा मृत्यू !!

You might also like More from author
देश घडामोडी विशेष

“मी तुमच्याबरोबर आहे,काळजी करु नका” !! पंतप्रधान मोदींनी दिला तृणमूल आणि ठाकरे…

देश घडामोडी विशेष

“पंतप्रधानांनी त्यांची पदवी आधी सार्वजनिक करावी तरच मी माझी सर्व कागदपत्रे…

देश घडामोडी विशेष

मोदी सरकार कॉक्रोच जनता पार्टीसमोर झुकले !! केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान…

देश घडामोडी विशेष

“भाजप व आरएसएससाठी धन हेच धर्म” कॉंग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आलोक शर्मा…

Prev Next
Leave A Reply
Cancel Reply

Your email address will not be published.

Recent Posts

  • यावल पंचायत समितीच्या दोन कर्मचाऱ्यांची तात्काळ बदली न झाल्यास १५ ऑगस्ट पासुन उपोषण !! कोरपावली प्रशासक तथा सरपंच विलास अडकमोल
  • राज्यासह व जिल्ह्यात क्यु आर कोड जन्म-मृत्यु दाखले मिळण्यास विलंबाबाबत राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस रावेर लोकसभा जिल्हाध्यक्ष राकेश सोनार यांचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना निवेदन !!
  • नगरसेविकेच्या तक्रारीची दखल घेत यावल नगराध्यक्ष छाया पाटील यांनी नदीपात्रात कर्मचाऱ्यांकडून केली तात्काळ स्वच्छता !!
  • यावल शहरातील विस्तारित वसाहतीमध्ये रहदारीच्या मार्गावरील धोकादायक लोंबकणाऱ्या विद्युत तारांचे नियोजन करण्याची शहरवासीयांची मागणी !!
  • यावल येथील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनातर्फे पर्यावरण संवर्धन रॅली !!

Recent Comments

  1. टीम पोलीस नायक on “शकुंतला तायडे महाराष्ट्राची हिरकणी पुरस्काराने सन्मानित”
  2. Digambar Tayade on “शकुंतला तायडे महाराष्ट्राची हिरकणी पुरस्काराने सन्मानित”
© 2026 - Police Nayak. All Rights Reserved.
Sign in
  • Home
  • देश विदेश
  • जळगाव जिल्हा
  • जळगाव विशेष
  • ग्रामीण विशेष
  • अहमदनगर जिल्हा
  • धुळे जिल्हा
  • नंदुरबार जिल्हा
  • नाशिक जिल्हा
  • कृषी
  • क्राईम
  • खेळ
  • पारंपरिक
  • महाराष्ट्र
  • मुंबई विशेष
  • राजकीय
  • राज्य
  • राज्य सरकार विशेष
  • रेल्वे प्रशासन
  • रोजगार विषयक
  • वैचारिक
  • शैक्षणिक
  • सामाजिक

Welcome, Login to your account.

Forget password?
Sign in

Recover your password.

A password will be e-mailed to you.