दिलीप गणोरकर
अमरावती विभागीय प्रमुख:-
शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे नाते हे सर्वात पवित्र असे आहे.आपल्या विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी शिक्षक प्रयत्नांची पराकाष्टा करतात.मात्र याच पवित्र नात्याला काळीमा फासत एका ४० वर्षीय शिक्षकाने आपल्यापेक्षा १७ वर्ष लहान असलेल्या विद्यार्थिनीला ‘चल आता आपण रिलेशनमध्ये येऊ’,असे म्हणत विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.जिल्ह्यातील मोर्शी येथील प्रवीण श्रीकृष्णराव धोटे असे आरोपी शिक्षकाचे नाव आहे.या १६ वर्षीय विद्यार्थिनीने आरोपी शिक्षकाविरुद्ध पोलीस ठाण्यात धाव घेतली असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी हा पेशाने शिक्षक आहे तर विद्यार्थिनी वरुड येथील एका शाळेत शिक्षण घेत असताना तिची या शिक्षकासोबत ओळख झाली.दरम्यान आरोपीने तिचा प्रवेश अमरावती येथील एका महाविद्यालयात करुन दिला होता त्यामुळे दोघांमधील संवाद आणि विचारांची देवाण-घेवाण वाढली.दरम्यान शिक्षकाने या संवादाचा चुकीचा अर्थ लावत थेट तिला चल आपण रिलेशनमध्ये राहू असा आग्रह धरला.शेवटी या शिक्षकाच्या कृत्याला कंटाळून त्या विद्यार्थिनीने थेट पोलीस ठाणे गाठले.आरोपी शिक्षकाने तिला कॉल केला आणि म्हटले की आपल्यातील शिक्षक आणि विद्यार्थिनीचे नाते आता संपवून टाकू मला तुझ्यासोबत रिलेशनशिपमध्ये राहायचे आहे तू मला खूप आवडतेस तुझ्यासोबत बोलायचे आहे. त्यानंतर या शिक्षकाने कॉल,वारंवार मेसेज, व्हाट्सअप चॅट करुन या तरुणीचा विनयभंग केल्याची घटना सुद्धा नमूद करण्यात आली आहे.पुढील तपास मोर्शी पोलीस करीत आहे.