Just another WordPress site

भडगाव येथे क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती जल्लोषात साजरी !!

जावेद शेख,पोलीस नायक

भडगाव तालुका (प्रतिनिधी) :-

येथे क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती निमित्ताने माळी पंच मंडळच्या वतीने शहरातील तहसील कार्यालय प्रांगणात क्रांतीसुर्य महात्मा फुले चौकात क्रांतीसुर्य महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पुजन पोलिस उपनिरीक्षक मनीष सोनवणे,माळी पंच मंडळ अध्यक्ष मुकुंदा महाजन,महात्मा फुले बहुउद्देशीय संस्था अध्यक्ष साहेबराव महाजन यांच्या हस्ते करण्यात आले तसेच सायंकाळी प्रतिमा मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले,

दरम्यान मोठ्या उत्साहाने वाद्यवृंद सह जय ज्योती जय क्रांती या घोषणेने रथ मार्गाने प्रतिमा मिरवणूक करण्यात आली.यावेळी आमदार किशोर पाटील यांच्या हस्ते क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले तर माळी पंच मंडळाच्या वतीने त्यांचा शाल श्रीफळ देत सत्कार करण्यात आला.यावेळी गोविंद महाजन,अनिल महाजन,मुकेश महाजन,गुलाब महाजन,सुरेश महाजन,सुनिल महाजन,विनोद महाजन,आप्पा महाजन,प्रदीप महाजन,मनोज महाजन,रमेश महाजन,नितीन महाजन,अरूण महाजन,जिभू महाजन,अनिल महाजन,सोपान महाजन,सागर महाजन,दिलीप महाजन,विनोद महाजनभिकन महाजन,गोकुळ महाजन,संतोष महाजन,अनिल महाजन,आबा महाजन,अविनाश महाजन,गणेश महाजन,सुनील महाजन आदी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रा.प्रवीण महाजन व प्रस्ताविक सागर महाजन तर आभार नितीन महाजन यांनी मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.