यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२३ जून २५ सोमवार
येथील सामाजिक कार्यकर्ते यशवंत गोविंद जासुद यांची मध्य रेल्वेच्या रेल्वे मंडळ सल्लागार समिती (DRUCC) सदस्यपदी नुकतीच निवड करण्यात आली असुन त्यांच्या निवडीचे सर्व स्तरातून स्वागत करण्यात येत आहे.यशवंत जासुद यांची ही निवड दोन वर्षांसाठी असून या निवडीचे पत्र रेल्वे विभागाचे मंडळ वाणिज्य प्रबंधक बि बि तपस्वी यांच्याकडून त्यांना प्राप्त झाले आहे.
सदरहू यशवंत जासूद यांच्या निवडीबद्दल त्यांचे रावेर-यावलचे आमदार अमोल जावळे,राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुका प्रा.मुकेश येवले,अतुल सोनवणे धुळे जिल्हाध्यक्ष उबाठा शिवसेना,माजी जि प सदस्य प्रभाकर सोनवणे,अतुल पाटील (माजी नगराध्यक्ष ),विजय पाटील,बोदडे नाना,डाॅ.कुंदन फेगडे,भगतसिंग पाटील,उमेश फेगडे,डाॅ.हेमंत येवले,हेमराज फेगडे,निंबा मराठे धुळे,देवकांत पाटील,शरद कोळी,जगदीश कवडीवाले,अरुण लोखंडे,गणेश महाजन यांनी स्वागत केले आहे.यशवंत जासुद यांना उमेश महाडिक महासचिव मध्य रेल कर्मचारी संघ मुंबई,विकास सोनवणे मंडळ सचिव भुसावळ अरविंद बाजपेयी मंडळ अध्यक्ष भुसावळ व सहकारी यांचे विशेष सहकार्याने निवड करण्यात आली आहे.दरम्यान येणाऱ्या काळात रेल्वे प्रवास आनंददायी व सुखाचा कसा होईल यासाठी प्रयत्न करू प्रवाशांच्या समस्या रेल्वे विभागापर्यंत पोहोचवू मला दिलेली जबाबदारी मनापासून पार पाडू रेल्वेच्या विकासासाठी आणि प्रवाशांच्या सोयीसाठी चांगले काम करू व प्रवाशांच्या हिताचे प्रश्न मांडून त्यांना योग्य तो न्याय मिळवून देवू तसेच रेल्वे प्रवाशांच्या रेल्वे सेवा व प्रवासी सुविधा संबंधित काही समस्या असतील तर त्या त्यांनी यशवंत गोविंदराव जासुद,श्री छत्रपती शिवाजी महाराज नगर,यावल तालुका यावल जिल्हा जळगाव या पत्त्यावर लेखी स्वरुपात सादर कराव्या असे आवाहन त्यांनी केले आहे.