Just another WordPress site

स्तुत्य उपक्रम : जावळे येथील मंगल कार्यालय परिसरात २०० झाडांचे वृक्षारोपण !!

जावेद शेख,पोलीस नायक

भडगाव तालुका (प्रतिनिधी) :-

चाळीसगाव तालुक्यातील जावळे येथे गावा लगत असलेल्या परदेशी मंगल कार्यालयाच्या नियोजीत जागेवर चाळीसगाव येथील परदेशी व राजपुत समाज उन्नती मंडळाच्या पदाधिकार्यांच्या हस्ते स्तुत्य उपक्रम राबवित विविध प्रकारचे वृक्ष लागवड नुकतीच करण्यात आली.

जावळे येथील रहिवाशी व परदेशी समाजातील दानशुर भगवान चञु परदेशी व त्यांचे कुटुंबियांनी ५६ आर जमिन विना मोबदला समाजाला दान दिलेली असून या जागेवर समाजाचे मंगल कार्यालयाचे उभारणीचे आयोजन सुरु आहे.सदरहू या जागेवर पामसह जवळपास २०० झाडांची लागवड करण्यात आली.या वृक्षांमुळे पुढे या भागात हिरवळीने निसर्ग सौंदर्य वाढणार आहे.यावेळी चाळीसगाव येथील परदेशी राजपुत समाज उन्नती मंडळाचे संस्थापक अध्यक्ष डाॅ.कर्तारसिंग सरदारसिंग परदेशी,अध्यक्ष भरतसिंग देवचंद छानवाळ,उपाध्यक्षा मथुराबाई भगवान परदेशी,संचालक सुभाष मन्नु महाजन,भगवान रघुविरसिंग परदेशी,भगवान चञु परदेशी जावळे,गोरख चञु परदेशी जावळे,कन्नड शिवसेना तालुका प्रमुख संजय राजपुत,सुनिल परदेशी जावळे,बाबुलाल परदेशी वडगाव यांचेसह समाजबांधव उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.