यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२६ जानेवारी २६ सोमवार
येथील जे.टी.महाजन इंग्लिश स्कूल वतीने आयोजित संस्कार स्नेहसंमेलन २०२५ -२६ कार्यक्रम शाळेच्या प्रांगणात मोठ्या उत्साहाच्या वातावरणात शाळेचे अध्यक्ष शरद जीवराम महाजन उपस्थित संपन्न झाला.शाळेच्या प्रांगणावर संपन्न झालेल्या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून यावल शाळेचे उपाध्यक्ष लिलाधर चौधरी,तहसीलदार मोहनमाला नाझिरकर,आरतीताई शरद महाजन, गट शिक्षण अधिकारी विश्वनाथ धनके,उल्पल चौधरी,रवींद्र पाटील, उल्हास चौधरी,ए.बी.महाजन,नितीन महाजन,प्रभाकर आप्पा सोनवणे,जी.जी.वाघुळदे, शाकीर सर,सेमी माध्यमाच्या प्राचार्या रंजना महाजन,इंग्लिश माध्यमाच्या प्राचार्या श्रीमती दिपाली धांडे ,प्रवीण झोपे,पर्यवेक्षिका श्रीमती राजश्री लोखंडे व गौरी भिरूड इ. मान्यवर उपस्थित होते.मान्यवराच्या हस्ते सरस्वती पूजन ,गणेश पूजन,प्रभू रामचंद्राचे पूजन व शाळेचे संस्थापक स्वर्गीय दादासाहेब जेटी महाजन यांचे प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून प्रजनन करण्यात आले. व कार्यक्रमाचे उद्घाटन झाले .यानंतर उपस्थित सर्व मान्यवरांच्या सत्कार करण्यात आला.
प्राचार्यांनी प्रास्ताविक सादर करून शाळेची माहिती दिली.यानंतर यावल तहसीलदार मोहनमाला नारझिरकर यांनी मनोगत सादर केले त्यात त्यांनी त्यांच्या लहानपणीचा एक प्रसंग सांगत म्हणाल्या की भविष्यात तुम्हाला हे बनायचे असेल ते बना परंतु बनाल ते प्रामाणिकपणे न्याय देता आला पाहिजे आणि जेवणाचा आनंद घेता आला पाहिजे ते सांगत त्यांनी ते सांगत त्यांनी सर्व चिमुकल्यांना आनंद देऊन त्यांचा उत्साह वाढविला.तसेच यावल पंचायत समितीचे गट शिक्षण अधिकारी B.E.O यांनी त्यांचे मनोगत व्यक्त करत शाळेच्या पुढील वाटचालीस साठी शाळेच्या संपूर्ण टीमला शुभेच्छा देऊन मार्गदर्शन केले.यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष शरद जिवराम महाजन यांनी देखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले त्यात त्यांनी सांगितले की विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासाचे ध्येय हेच हे खरं शिक्षण असते .
यानंतर गणेश वंदना या सामूहिक नृत्याने स्नेहसंमेलनाची सुरुवात करण्यात आली.कोळी नृत्य,नारी सन्मान,शेतकरी नृत्य,देवी स्तुती,सामूहिक नृत्य,देशभक्तीपर नृत्य,नाटिका असे विविध बहादार कार्यक्रम विद्यार्थ्यांनी सादर केले.सर्व विद्यार्थ्यांच्या कार्यक्रमांनी उपस्थिती रसिकांनी उत्तम असा प्रतिसाद दिला काही कार्यक्रम उपस्थित लक्ष वेधून घेत होते .या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन .मनीषा पाटील व श्रद्धा बडगुजर यांनी केले व शाळेच्या विद्यार्थिनी यामध्ये सहभाग घेऊन सूत्रसंचालन उत्कृष्ट करण्यासाठी रंगत भरली.या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन शिक्षिका प्रीती भार्गव यांनी केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेच्या पर्यवेक्षिका गौरी भिरूड व राजश्री लोखंडे यांनी मार्गदर्शन केले .सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या मदतीने यशस्वी रीतीने मोठ्या उत्साहासत पार पडला या कार्यक्रमास विद्यार्थ्यांनी व पालक मोठ्या संख्येने उपस्थिती दिली आणि कार्यक्रम रंगदार झाला.