वारंवार तक्रारी नंतरही वन विभागाची कारवाई शून्य !! वन विभागाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत भीम आर्मी भारत एकता मिशनतर्फे आंदोलनाचा इशारा !!
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२५ फेब्रुवारी २६ बुधवार
भुसावळ टोल नाका ते फैजपूर कारखाना दरम्यान सुरू असलेल्या रस्त्याच्या कामासाठी मोठ्या प्रमाणात झालेल्या वृक्षतोडीमुळे परिसरात संतापाची लाट उसळली असून वन विभागाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.सदरहू सदरील बेकायदेशीर वृक्षतोडीची तात्काळ चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
या संदर्भात भीम आर्मी भारत एकता मिशनचे जळगाव जिल्हा प्रसिद्धी प्रमुख राहुल जयकर यांनी वन विभागाकडे वारंवार तक्रारी व स्मरणपत्रे देऊनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई न झाल्याचा आरोप करण्यात आला असून राहुल जयकर यांनी ६ जानेवारी २०२६,६ फेब्रुवारी २०२६ व २३ फेब्रुवारी २०२६ रोजी दिलेल्या स्मरणपत्रांमध्ये वृक्षतोडीची सखोल चौकशी करून चौकशी पूर्ण होईपर्यंत संबंधित ठेकेदाराचे बिल थांबवण्याची मागणी केली आहे.अर्जदारांनी वन परिक्षेत्र अधिकारी (यावल पूर्व) स्वप्निल फटांगरे यांच्याकडे तक्रार दिली असली तरी अद्याप कारवाई न झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.स्थानिकांच्या मते मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झाल्यामुळे पर्यावरणीय हानी होत असून प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे.दरम्यान बेकायदेशीर वृक्षतोड सिद्ध झाल्यास संबंधित ठेकेदार व जबाबदार अधिकाऱ्यांवर तातडीने गुन्हे दाखल करून कठोर कायदेशीर कारवाई करावी अन्यथा वन परिक्षेत्र अधिकारी कार्यालय यावल समोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा ठाम इशारा देण्यात आला आहे.तसेच न्याय न मिळाल्यास मोठ्या प्रमाणात लोकशाही मार्गाने आंदोलन उभारण्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.प्रसंगी तक्रारी संदर्भात स्मरणपत्र देतांना भीम आर्मी भारत एकता मिशनचे जळगाव जिल्हा प्रसिद्धी प्रमुख राहुल जयकर व युनुस तडवी यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.