शेख इम्रान,पोलीस नायक
बुलढाणा जिल्हा (प्रतिनिधी) :-
दि.१४ मार्च २६ शनिवार
जिल्ह्यात वरली मटका,अवैध व विनापरवाना हातभट्टी देशी दारु तसेच ईतर अवैध धंदे करणाऱ्या ईसमांचा शोध घेऊन त्यांचेवर कायदेशीर कार्यवाही करुन अवैध धंदे नष्ट करण्यासाठी पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी स्थानिक गुन्हे शाखेला आदेशीत केले होते.सदर आदेशाप्रमाणे पोनि.सुनिल अंबुलकर स्थानिक गुन्हे शाखा-बुलढाणा यांनी अधिनस्त पोलीस अधिकारी व अंमलदार यांची वेगवेगळी स्वतंत्र पथके तयार करुन त्यांना वरिष्ठांच्या सुचनांप्रमाणे कार्यवाही करणेबाबत सुचित केले होते.सदर अनुषंगाने दि.१२ मार्च रोजी पोनि.सुनिल अंबुलकर यांचे नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने महाराष्ट्र जुगार कायद्या प्रमाणे पो.स्टे.मेहकर हद्दीत ग्राम देउळगाव माळी येथे वरली मटका जुगार खेळणाऱ्या ईसमावर कार्यवाही करुन आरोपी रामदास भानुदास हिवाळे वय ५४ वर्षे रा.दे.माळी ता.मेहकर यास पकडून त्याचे ताब्यातून नगदी व जुगार साहित्य असा २२८५/-रु.चा मुद्देमाल हस्तगत केला.तसेच पो.स्टे.मलकापुर ग्रामीण हद्दीत ग्राम दाताळा येथे वरली मटका जुगार खेळणाऱ्या ईसमांवर कार्यवाही करुन आरोपी राहुल सुरेश सुरडकर वय २९ वर्ष रा.मलकापुर यास पकडून त्याचे ताब्यातून नगदी व जुगार साहित्य असा ९१०/- रु.चा मुद्देमाल हस्तगत केला.पो.स्टे.तामगाव हद्दीत वरली मटका जुगार खेळणाऱ्या ईसमावर कार्यवाही करुन आरोपी शेख अजगर शेख अकबर व इतर ६ जणांवर रेड करुन त्याचे कडून नगदी मोबाईल असा ६३५०/-रु. नगदी व १२८०००/- व इतर साहित्य असा १३४३५०/- रु चा मुद्देमाल हस्तगत केला असून नमुद आरोपी विरुध्द महाराष्ट्र जुगार कायद्या प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
तर महाराष्ट्र दारुबंदी कायद्याप्रमाणे पो.स्टे.बोराखेडी हद्दीत ग्राम जवळा बाजार येथे अवैध दारु बाळगणाऱ्या ईसमावर कार्यवाही करुन आरोपी सुनील उखर्डा ढोकणे वय ४२ वर्षे रा.जवळाबाजार ता.नांदुरा यास पकडून त्याचे ताब्यातून देशी विदेशी दारुच्या ४६ नग शिश्या व साहित्य असा ४६४०/- रु.चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.तर पो. स्टे,अमडापुर हद्दीत ग्राम अमडापुर येथे अवैध दारु बाळगणाऱ्या ईसमावर कार्यवाही करुन आरोपी गजानन जयराम वानखेडे वय २६ वर्षे,रा.अमडापूर यास पकडून त्याचे ताब्यातून विदेशी दारुच्या ४४ नग शिश्या व मारुती सुझुकी इक्को कार असा १५९६६०/- रु.चा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून उपरोक्त आरोपी विरुध्द म.दा.का. कलम ६५ प्रमाणे गुन्हा नोंद दाखल आहे.एकंदरीत स्थानिक गुन्हे शाखेच्या विवीध पथकांनी बुलढाणा जिल्ह्यातील पो.स्टे.मेहकर १,पो.स्टे.मलकापुर ग्रामीण २,तामगांव -७ येथे म.जु.का.प्रमाणे तर पो.स्टे.बोराखेडी व अमडापुर येथे मदाका प्रमाणे कार्यवाही करुन एकूण २ आरोपींविरुध्द गुन्हा नोंद करुन ३०१८४५/-रु.चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून पुढील तपास संबंधीत पोलीस स्टेशन करीत आहे.सदर कार्यवाही निलेश तांबे,पोलीस अधीक्षक बुलढाणा यांचे आदेशान्वये तर श्रेणिक लोढा,अपर पोलीस अधीक्षक खामगांव,अमोल गायकवाड अपर पोलीस अधीक्षक बुलढाणा यांचे मार्गदर्शनाखाली पोनि.सुनिल अंबुलकर स्था.गु.शा.बुलढाणा यांचे नेतृत्वात सपोनि. यशोदा कणसे,पोउपनि पंकज सपकाळे,अविनाश जायभाये,पोहेका विजय पैठणे,अनंता फरतळे,शरद गिरी,गजानन दराडे,युवराज राठोड,दिनेश बकाले,दिपक लेकुरवाळे, एजाज शेख,गणेश पाटील,गजानन गोरले,सतीश नाटेकर,राकेश नायडू,सुनील मिसाळ,गणेश वाघ,मपोका दिपाली चव्हाण,अमोल वनारे,अमोल अंभारे,चालक पोकों निवृत्ती आदीनी पार पाडली.