Just another WordPress site

यावल विभाग जळगाव उपवनसंरक्षक जमीर शेख यांची बदली तर नवीन उपवनसंरक्षक म्हणुन सौरीष सहाय यांनी पदभार स्वीकारला !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.१४ मार्च २६ शनिवार

यावल वन विभागाच्या उप वनसंरक्षक पदावर कार्यरत असलेले जमीर शेख यांची नियतकालिक बदली झाली असून त्यांचे जागेवर उपवनसंरक्षकपदी सौरीष सहाय यांनी नुकताच सदरील पदाचा पदभार स्वीकारला आहे.

सौरीष सहाय यांची ही दुसरी पोस्टिंग असून यापूर्वी त्यांनी दूधवा व्याघ्र प्रकल्पामध्ये कार्य केलेले आहे. उपक्नसंरक्षक सौरीष सहाय यांनी गुरुवारी कार्यभार स्वीकारला असून, या प्रसंगी यावल वन विभागातील सहाय्यक वन संरक्षक व यावल पुर्व विभागाचे वन परिक्षेत्र अधिकारी स्वप्नील फंटागरे,पश्चीम विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रशांत जोशी,रावेरचे वन परिक्षेत्र अधिकारी संजय काळे,चोपडा वन परिक्षेत्र अधिकारी भाईदास थोरात यांच्यासह अन्य अधिकारी या प्रसंगी उपस्थित होते.यावल वन विभागाची पोस्टिंग ही आव्हानात्मक असली तरी देखील संघटनात्मकरीत्या त्या आव्हानांचा आपण सामना करण्याचे त्यांनी सूतोवाच यावेळी नव्याने रुजु झालेले उपवनसंरक्षक सौरीष सहाय यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.