Just another WordPress site

यावल तालुक्यातील ८ सीएससी केंद्रांच्या माध्यमातून कोट्यवधींची फसवणूक उघड !! कृषी अधिकाऱ्यांनी दिली तक्रार !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.२० मार्च २६ शुक्रवार

तालुक्यातील विविध गावांमध्ये कार्यरत असलेल्या जनसुविधा केंद्रांमार्फत (सीएससी-CSC) शेतकऱ्यांची तब्बल १६कोटी ६३ लाख ४८ हजार ८५ रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असुन याप्रकरणी यावल पोलीस स्टेशन येथे गुन्हा क्रमांक ८o/२०२६ अंतर्गत भा.द.सं.कलम ३१८ (४),३३६(३) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान फिर्यादी भरत वामन वारे वय ५२ यांनी यावल पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार,यावल तालुक्यातील साकळी,निमगाव,मनवेल,भालोद,मोहाळे व यावल येथील विविध सीएससी केंद्र चालकांनी एकत्रितपणे हा गैरप्रकार केल्याचे निष्पन्न झाले आहे.प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगाम २o२५-२६ साठी विमा नोंदणी करताना संबंधित सिएससी केंद्र चालकांनी शेतकऱ्यांकडून ७/१२ उतारा,आधार कार्ड,बँक पासबुक आदी कागदपत्रे घेतली मात्र प्रत्यक्षात पीक न लावलेल्या क्षेत्राचे खोटे दाखले तयार करून मोठ्या प्रमाणावर विमा रक्कम मिळविण्याचा कट रचला.यात शेतकरी प्रभावित २२८४.९ हेक्टर क्षेत्र दाखवण्यात आले असून प्रत्यक्षात नसताना २४३७.३९हेक्टर क्षेत्र दाखवून तब्बल १o८९.२८ हेक्टर अतिरिक्त क्षेत्र दाखवले आहे.या सर्व बनावट माहितीच्या आधारे शासनाची फसवणूक करून कोट्यवधींचा अपहार करण्यात आला असून या प्रकरणात विविध सिएससी CSC केंद्र चालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.यामध्ये तालुक्यातील साकळी,निमगाव,मनवेल,भालोद, मोहाळे व यावल येथील संचालकांचा समावेश आहे.पुढील कारवाई या प्रकरणाची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना मिळताच तात्काळ गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळेच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहे.आरोपीं विरोधात कठोर कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.निष्कर्ष शेतकऱ्यांच्या नावावर योजनांचा गैरवापर करून कोट्यवधींची लूट करणाऱ्या या प्रकारामुळे प्रशासना सह नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.दोषींवर कठोर कारवाईची मागणी जोर धरत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.