Just another WordPress site

यावल-चोपडा नाक्यावर धावत्या दुचाकीवरच तरुणाचा हृदयविकाराच्या तिव्र झटक्याने मृत्यू !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.२३ मार्च २६ सोमवार

शहरातून जाणाऱ्या अंकलेश्वर-बऱ्हाणपूर राज्य मार्गावर चोपडा नाक्याजवळ एका ३२ वर्षीय तरुणाचा दुचाकीवरून कोसळून दुदैवी मृत्यु झाल्याची घटना आज दि.२३ मार्च सोमवार रोजी नुकतीच समोर आली आहे.

या संदर्भात मिळालेली माहीती अशी की,यावल शहरातील जुना चोपडा नाक्याजवळ दुचाकीवरून गावात येणाऱ्या महेश संतोष येवले वय ३२ वर्ष राहणार शिवाजीनगर यावल या तरुणाला धावत्या दुचाकीवरच हृदयविकाराचा तिव्र झटका आला.सदर तरुण हा दुचाकीसह रस्त्यावर कोसळल्याचे पाहून परिसरातील मुस्लिम तरुणांनी तातडीने या तरुणास अपघात स्थळावरून उचलून यावलच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता ग्रामीण रूग्णलयात वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी करून त्यास मयत घोषित केले.सदर घटना आज दि.२३ मार्च रविवार रोजी दुपारी घडली असून या संदर्भात पोलीसात नोंद करण्यात आली आहे.दरम्यान यावल शहराला लागून असलेल्या अंकलेश्वर-बऱ्हाणपूर राज्य मार्गावर चोपडा नाक्याजवळ कोरपावली शेत शिवारातून शेतातून काम करून महेश संतोष येवले वय ३२ रा.शिवाजीनगर यावल हा तरूण त्याच्याकडील दुचाकीने शहरात येत असतांना जुना चोपडा नाक्याचा जवळ अचानक धावत्या दुचाकी वर त्याला हृदयविकाराचा तीव्र झटका आला व तो दुचाकीसह खाली कोसळला या त्यास उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयामध्ये आणले असता वैद्यकीय अधिकारी डॉ.तुषार सोनवणे यांनी तरूणास तपासणी करून त्याला मयत घोषित केले. अपघाताची माहिती मिळताच यावलच्या नगराध्यक्ष छाया पाटील,नगरसेवक अतुल पाटील,माजी उपनगराध्यक्ष मुकेश येवले,रोशन येवले,बापू जासूदसह आदींनी रुग्णालयात धाव घेतली आणि मयत तरुणांच्या कुटुंबांचे सात्वन केले.

Leave A Reply

Your email address will not be published.