Just another WordPress site

ठेवीदारांच्या ठेवी बुडविणाऱ्या पतसंस्था चालकांना पाठीशी घालणाऱ्यांवर गुन्हे दाखल करावे !! शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा उपसंघटक नितिन सोनार यांची निवेदनाद्वारे मागणी !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.२६ मार्च २६ गुरुवार

तालुक्यातील सहाय्यक निबंधक यांच्या विषयी मोठ्या प्रमाणावर नागरिक ठेवीदारांच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या व त्याच्या अनुषंगाने जळगावच्या निवासी उपजिल्हाधिकारी वैशाली चव्हाण यांना निवेदन देऊन यावल तालुक्यातील बारा ते चौदा वर्षापासून कार्यरत असतांना तत्कालीन सहाय्यक निबंधक अच्युत नगरे यांच्या कार्यकाळामध्ये करोडो रुपयांचे भ्रष्टाचार करून पळ काढला असून त्यांच्यावर कायमचे निलंबन करण्यात येवुन गुन्हा दाखल करावा अशी मागणी एका तक्रार निवेदनाव्दारे शिवसेना शिंदे गटाच्या रावेर लोकसभा क्षेत्राचे जिल्हा उपसंघटक नितिन श्रावण सोनार यांनी जिल्हाधिकारी जळगाव यांचेकडे नुकतीच केली आहे.

दरम्यान अशा भ्रष्ठ अधिकाऱ्याची खाते निहाय चौकशी करून त्यांच्यावर देखील आर्थिक भ्रष्ठाचाराचे तात्काळ गुन्हे दाखल करण्यात यावे अशा पद्धतीचे रोखठोक भूमिका घेऊन काल तक्रार अर्ज सादर केला आहे.ज्या सरकारी अधिकाऱ्यांकडे बँकेच्या ठेवी त्यांच्यावर जबाबदारी होती ठेवी सांभाळण्याची शासनाकडून त्यांनी ती जबाबदारी न सांभाळता स्वतः चेअरमनच्या आणि कर्मचाऱ्यांच्या संगमताने शासनाचा पैसा समजून दिवसा बँकेवरती दरोडा टाकला आणि ठेवीदारांचे पैसे लुटण्यासाठी या सरकारी अधिकाऱ्यांनी रस्ता मोकळे करून दिला हा त्यांचा गुन्हा आहे.परिणामी पतसंस्थेचे आपल्या कष्टाचे पैसे ठेवले आहे त्यांना ही माझी विनंती आहे की,आपण ठेवीच्या जे पैसे पतसंस्थांमध्ये ठेवले आहे ते शासनातील कर्मचाऱ्यांच्या भरोसे हे पैसे ठेवले होते म्हणून तेच सरकारने नेमणुक करून दिलेले अधिकारी हे तुमच्या पैशाला लुटण्यासाठी किंवा लुटवण्यासाठी सरकारी अधिकारी हे दुरूपयोग करीत आहे व तुमचा विश्वास हा शासनावर होता व चेअरमन वरती किंवा संचालकावरती न होता म्हणून आपण शासनाकडून नेमलेला त्या काळातील किंवा आज असलेला सहाय्यक निबंधक हेच जबाबदार असून आपण त्याच्याविरुद्ध सहकार राज्यमंत्री,आयुक्त,तत्कालीन अधिकाऱ्या विरुद्ध तक्रार करून त्यांच्या विरुद्ध पुरावे देऊन आपल्या ठेवीचे पैसे मागण्या संदर्भात मी मागील दोन महिन्यापूर्वी ज्या पतसंस्थेच्या ठेवीदारा पैसे अडकले आहे पैसे अडकले आहे त्यांना माझी विनंती आहे.आपण संबधीत पतसंस्था चेअरमनच्या मालमत्तेवरती आपल्या ठेवीच्या पैशाचा बोजा लावावा जेणेकरून तो चेअरमन ती मालमत्ता विकताना तुमचे पैसे दिल्याशिवाय विकू शकणार नाही असे झाल्यास संबधित अधिकारी यास जबाबदार आढळून आल्यास त्याच्यावर देखील गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी मागणी शिवसेना शिंदे गटाचे रावेर लोकसभा क्षेत्राचे जिल्हा उपसंघटक नितिन सोनार यांनी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.