यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२२ मे २६ शुक्रवार
शहर व परिसरात डिझेल-पेट्रोलची मोठ्या प्रमाणात टंचाई निर्माण झाली असुन पेट्रोल पंपावर इंधन उपलब्ध नसल्याने नागरिक,शेतकरी,व्यापारी,वाहन धारकांसह सर्वसामान्य जनता अडचणीत सापडली आहे.याबाबत यावल शिवसेना उबाठा यांचे वतीने नगराध्यक्ष छाया पाटील यांच्या प्रमुख उपस्थित तहसीलदार यांना आज दि.२२ मे शुक्रवार रोजी निवेदन देण्यात आले.
सदर निवेदनात म्हटले आहे की,रुग्णवाहिका मालवाहतूक व अत्यावश्यक सेवांवर झालेला परिणाम नोकरीसाठी येजा करणाऱ्या नागरिकांना अडचणी,काळाबाजार व ज्यादा दराने इंधन विक्रीची शक्यता वाढली,शेती हंगामावर विपरीत परिणाम होत असल्याने शेतकऱ्यांची आर्थिक नुकसान होण्याची भीती वाढली,वाहतूक व्यवस्था विस्कळीत होऊन नागरिकांचे दैनंदिन जीवन विचलित झाले असल्याची संतप्त भावना माजी नगराध्यक्ष व नगरसेवक अतुल पाटील यांनी व्यक्त केली.ते पुढे म्हणाले की,जर प्रशासनाने या विषयाची तात्काळ दखल घेऊन संबंधित तेल कंपन्या व प्रशासनाशी समन्वय साधून यावल शहरात नियमित व सुरळीत डिझेल-पेट्रोल पुरवठा सुरू करावा. तसेच कृत्रिम टंचाई निर्माण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी नाहीतर नागरिकांच्या वतीने तीव्र लोकशाही आंदोलन छेडण्याचा इशारा नायब तहसीलदार शैलेष तरसोदे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.याप्रसंगी नगराध्यक्ष छाया पाटील,शिवसेना (उबाठा) चे जिल्हा उपप्रमुख गोपाळ चौधरी,यावल तालुका प्रमुख शरद कोळी,यावल शहरप्रमुख जगदीश कवडीवाले,शिवसेना (उबाठा) चे नगरपालीका गटनेता सागर चौधरी,नगरपालिका शिक्षण समिती सभापती पराग सराफ,नगरसेविका वैशाली बारी, संतोष खर्चे,पप्पू जोशी,निलेश बारी,मयूर खर्चे,गौरव जोशी,गोलु माळी,अब्दुल करीम मन्यार,सारंग बेहेडे,प्रविण लोणारी यांच्या सह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.