प्रहार दिव्यांग क्रांती संस्थेच्या वतीने दिव्यांग बांधवांच्या विविध प्रलंबीत मागण्यासंदर्भात तहसीलदारांना निवेदन !!
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२२ मे २६ शुक्रवार
शासन निर्णयानुसार यु डी आय डी नसलेल्या दिव्यांग बांधवांसाठी विशेष अभियानाअंतर्गत तालुकास्तरावर विशेष अभियान शिबिर घेऊन ज्यांच्याकडे अजूनही यु डी आयडी कार्ड नाहीत अशा बांधवांचे नाव नोंदणी करून घ्यावी यासह अनेक मागण्याबाबत प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या वतीने आज दि.२२ मे रोजी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
दरम्यान दिव्यांग बांधवांकडे यु डी आयडी कार्ड नसेल अशांची विशेष अभियानात नोंदणी करावी,संजय गांधी निराधार योजना व इतर योजनांपासून वंचित असलेल्या दिव्यांग लाभार्थ्यांची गावनिहाय माहिती संकलित करावी,तलाठी,ग्रामसेवक,आशा वर्कर,सेविका यांच्या मदतीने वंचित दिव्यांकांचा सर्वे करावा,पात्र दिव्यांगांना शासन निर्णयानुसार तत्काळ लाभ मिळवून देण्यासाठी संबंधित विभागांना स्पष्ट निर्देश द्यावेत,जन्मतारीख तफावत इत्यादी तांत्रिक त्रुटी तातडीने दुरुस्त कराव्यात,तालुक्यात किती दिव्यांगांना संजय गांधी योजनेचा लाभ मिळतो त्यापैकी कितींकडे यु डी आय डी आहे आणि ज्यांच्याकडे नाही त्यांची गाव निहाय यादी द्यावी अशा विविध विषयांचे निवेदन नायब तहसीलदार शैलेष तरसोदे यांना देण्यात आले.यावेळी तालुकाध्यक्ष हरिभाऊ पाटील,उपाध्यक्ष प्रतीक पाटील,ललित पाटील,महिला आघाडी यावल शहराध्यक्ष मिनाबाई देशमुख,रामदास पाटील,बाळकृष्ण चौधरी,रमेश आमोदे,रेखाबाई चौधरी,छायाबाई देशमुख,सपना वायकोळे,चंद्रकांत पाटील,विलास तेली अटरावलकर,हमीद भाई यांचे सह अनेक दिव्यांग बांधव उपस्थित होते.