Just another WordPress site

डॉ डिगंबर तायडे पंजाब सरकारतर्फे “भारत विभूषण पुरस्कार २०२६” ने सन्मानित !! २८ एप्रिल रोजी पंजाब विधानसभा भवनात राज्यपाल व विधानसभा अध्यक्षांच्या हस्ते सत्काराचे आयोजन !!

बाळासाहेब आढाळे

पोलीस नायक,मुख्य संपादक

दि.०४ एप्रिल २६ शनिवार

आपली पुरस्कार मिळविण्याची जिद्द कायम ठेऊन अहोरात्र सदर कार्यात मेहनत घेत आपल्या शिरपेचात एकामागून एक पुरस्कार ओवणारा पुरस्कारांचा महामेरू “ भारत विभूषण “ डॉ डिगंबर सिताराम तायडे यांना इन्स्टिट्यूट ऑफ सोशल रिफार्म अँड हायर एज्युकेशन चॅरिटेबल ट्रस्ट पंजाब सरकारच्या वतीने नुकताच “भारत विभूषण पुरस्कार २०२६” जाहीर करण्यात आला असून दि.२८ एप्रिल २६ मंगळवार रोजी पंजाब विधानसभा भवनात पंजाबचे राज्यपाल गुलाब चंद कटारिया व पंजाब विधानसभा अध्यक्ष सरदार कुलतार सिंग संधवान यांच्या हस्ते सत्कार समारंभात सन्मानित करण्यात येणार आहे.जळगाव जिल्ह्यातील व यावल तालुक्यात असलेल्या डोंगर कठोरा या सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या खेडेगावातील रहिवाशी डॉ डिगंबर तायडे यांची पुरस्कार जिंकण्याची झळाळी दिवसेंदिवस वाढत असून पंजाब सरकारच्या पुरस्काराची यात भर पडली आहे.डॉ डिगंबर तायडे यांनी आजपावेतो देशांतर्गत तसेच परदेशातील १५० च्या वर पुरस्कार मिळवून आपला नावलौकिक देशासह परदेशातही मिळविला आहे.दरम्यान आपल्या दैदिप्यमान कामगिरीत नेहमी सातत्य ठेऊन आपल्या शिरपेचात आणखीन एका पुरस्काराची संख्या वाढवत डॉ.डिगंबर तायडे यांनी १५० च्यावर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय ट्राफी,पदके,सन्मानपत्रे व पारितोषिके मिळवून भारतातून एक नंबर आपणच असल्याचे त्यांनी सिद्ध करून दाखविले आहे अशी भावना जनसामान्यातून व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान पंजाब सरकारच्या वतीने डॉ डिगंबर तायडे यांनी कला,सामाजिक व विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल त्यांच्या कार्याची दखल पंजाब सरकारने घेतली असून त्यांना पंजाब सरकारचा “भारत विभूषण पुरस्कार २०२६” देऊन सन्मानित करण्यात येणार असून सदरील निवडीचे पारितोषिक पत्र तसेच दि.२८ एप्रिल २६ मंगळवार रोजी पंजाब विधानसभा भवनात सत्काराकरिता उपस्थित राहण्याचे पत्र त्यांना देण्यात आले आहे.सदरहू पंजाब सरकारच्या इन्स्टिट्यूट ऑफ सोशल रिफार्म अँड हायर एज्युकेशन चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे पंजाब विधानसभा चंदीगड येथे पंजाबचे राज्यपाल गुलाब चंद कटारिया व पंजाब विधानसभा अध्यक्ष सरदार कुलतार सिंग संधवान यांच्या हस्ते भारत विभूषण पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे.यात डॉ डिगंबर तायडे यांना याआधी भारताचे राष्ट्रपती महामहीम व्ही व्ही गीरी यांचे हस्ते स्काऊट मास्टर तसेच विशेष बाब म्हणजे डॉ डिगंबर तायडे यांनी गायन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल त्यांचा यूएसए सरकारच्या बुक ऑफ वर्ड रेकॉर्ड मध्ये समाविष्ट करण्यात आले आहे हे विशेष !.

त्याचबरोबर डॉ डिगंबर तायडे यांनी संगीत,कला,नृत्य,खेळ,समाजसेवा अश्या विविध क्षेत्रात नाव लौकीक मिळवत १५० च्यावर पुरस्कार मिळविले असून त्यांच्या “माता गंगा” या लघु चित्रपटाला जपान ईन्टरनॅशनल फिल्म फेस्टीव्हल,नॅशनल आर्ट फिल्म फेस्टीव्हल,ईन्टरनॅशनल स्क्रीन फिल्म फेस्टीव्हल,मालदा फिल्म फेस्टीव्हल मध्ये एकूण १४ पुरस्कार प्रदान करण्यात आलेले आहेत.त्याचबरोबर त्यांच्या सुविद्य पत्नी शकुंतला तायडे यांनी देखील डॉ डिगंबर तायडे यांच्या सदैव पाठीशी उभे राहून अहोरात्र त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करीत “हम किसी से कम नही” या उक्तीच्या माध्यमातून विविध पुरस्कार,ट्राफी,पदके,सन्मानपत्रे व पारितोषिके मिळविले आहेत.यात दुबई सरकारचा इंटरनॅशनल ईन्फ्लुएन्स द्वारा सदर दाम्पत्याला देण्यात आलेला “प्रतिष्ठित दूत” पुरस्काराचा समावेश आहे.सदरहू डॉ डिगंबर तायडे यांना प्रतिष्ठित असलेला पंजाब सरकारचा “भारत विभूषण पुरस्कार २०२६” पुरस्कार जाहिर झाल्याबद्दल त्यांच्यावर विविध स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत असून विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून शुभेच्छा दिल्या जात आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.