यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.११ एप्रिल २६ शनिवार
येथील व्यास शिक्षण मंडळ संचालित जे.टी.महाजन इंग्लिश स्कूल मध्ये थोर समाजसुधारक,विचारवंत आणी क्रांतीकारी लेखक महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्साहाच्या वातावरणात साजरी करण्यात आली.
सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती दिपाली धांडे होत्या.तसेच सेमी माध्यमाच्या मुख्याध्यापिका रंजना महाजन,पर्यवेक्षिका श्रीमती राजश्री लोखंडे व गौरी भिरूड उपस्थित होत्या.या कार्यक्रमाची सुरुवात महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.यानंतर शाळेच्या शिक्षिका कुंदा नारखेडे यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या बद्दल विद्यार्थ्यांना थोडक्यात माहिती दिली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वर्षा चौधरी यांनी केले व आभार प्रदर्शन पूनम कोळंबे यांनी केले.तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अनमोल सहकार्याने कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यात आला.