यावल नगरपालिका शालेय समिती निवडीला विरोधकांनी केलेला विरोध बेकायदेशीर !! नगरसेवक अतुल पाटील यांची स्पष्टोक्ती
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.१७ एप्रिल २६ शुक्रवार
येथील नगरपालिकेच्या नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेदरम्यान विषय क्रमांक आठ हा नगरपालीका संचलीत साने गुरूजी माध्यामिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील शालेय समिती गठीत करण्याबाबत होता.सदर शालेय समिती निवडीस विरोधकांनी केलेला विरोध हा बेकायदेशीर असल्याचे नगरसेवक अतुल पाटील यांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान सदरील शालेय समिती निवडीबाबत सत्ताधारी गटाचे नगरसेवक पराग सराफ यांनी लेखी स्वरूपात सूचना मांडून लोकनियुक्त नगराध्यक्षा छाया पाटील यांना शालेय समिती अध्यक्ष व नगरसेवक सागर चौधरी,वैशाली बारी,शेख शाहिनबनो शेख रज्जाक यांना सदस्य करून पदसिद्ध सचिव मुख्याध्यापक व एक शिक्षक प्रतिनिधी व शिक्षकेतर प्रतिनिधी नेमण्याबाबत सूचना मांडली व त्यास आठ सदस्य असलेल्या काँग्रेस गटनेत्या कमरुनिसाबी सैफुद्दीन यांनी अनुमोदन दिले होते.सदरहू असे असतांना भाजप नगरसेवक बाळू फेगडे यांनी या समितीसाठी नगरसेवक राकेश कोलते यांचेसह अन्य तीन नावे घ्यावीत अशी सूचना केली.एकाच विषयासाठी दोन वेगवेगळ्या सूचना प्राप्त झाल्याने सदर सूचना मतदानास टाकावी अशी सूचना मी स्वतः मांडली असतांना विरोधकांनी सभात्याग केला.वास्तविक त्यांनी केलेला सभात्याग हा बेकायदेशीर होता.आम्ही बहुमताच्या जोरावर मंजूर केलेला ठराव जर बेकायदेशीर असेल तर आपण जिल्हाधिकारी यांचेकडे तक्रार करावी अशी विनंती त्यांना केली मात्र त्यांनी सभात्याग केला.वास्तविक पाहता आम्ही आजच्या सभेत केलेली शालेय समितीचे गठण शासन निर्णय दि.२७/o३/२००३ प्रमाणे व माध्यमिक शाळा संहिता १९८६ मधील प्रकरण १ कलम १७ मधील तरतुदी व नियम १० प्रमाणे केलेले आहे व असे असतांना मात्र केवळ विरोधाला विरोध ही भूमिका विरोधकांनी घेऊन सभात्याग केलेला आहे जो बेकायदेशीर आहे असे अतुल पाटील यांनी म्हटले आहे.प्रसंगी विरोधकांच्या सभा बहीष्कारानंतर यावल शहराच्या विविध विकास कामांचे एकूण २७ विषयांना बहूमताने मंजुरी देण्यात आली.