Just another WordPress site

किनगाव प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्णवाहीका आजारी असल्याने परिसरातील रूग्णांचे हाल !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.१७ एप्रिल २६ शुक्रवार

तालुक्यातील किनगाव येथील प्राथमीक आरोग्य केंन्द्रात असलेली रुग्णवाहिका क्रमांक एम.१९ एम.९२९१ हि २६ फेब्रुवारी २०२६ पासून दुरुस्तीसाठी जळगाव येथे पाठवण्यात आली व ती ६ मार्च २०२६ रोजी दुरुस्तही झाली असून सदर रूग्णवाहिकेचे दुरुस्तीचे बिल २१३२७ रुपये हे दि.६ मार्चलाच जिल्हा परिषदेकडे पाठवण्यात आले.मात्र जिल्हा परीषद रुग्णवाहिका दुरुस्तीचे बिल देत नसल्याने रुग्णवाहिका किनगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात उपलब्ध होत नसल्याने रुग्णांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत.

दरम्यान रुग्णवाहिका उपलब्ध होत नसल्याने रुग्ण व प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी आणी वैद्यकीय अधिकारी यांचे आपापसात वाद होत असल्याचे चित्र सदरी आरोग्य केंद्रात पाहायला मिळत आहे.तरी जिल्हा वैद्यकीय अधिकारी यांनी त्वरित या गाडीचे दुरुस्तीचे बिल ध्येय करून रुग्णवाहिका किनगाव प्राथमिक आरोग्य केंद्राला उपलब्ध करून द्यावी अशी मागणी परिसरातील रुग्णाच्या वतीने करण्यात आली आहे.जिल्हाधिकारी यांच्याकडून मार्च महीण्यातच आरोग्य विभागाचा निधी जिल्हा परिषदेला प्राप्त झाला आहे मात्र तांत्रिक अडचणींमुळे रुग्णवाहिका दुरुस्तीचे बिल देता येत नाही म्हणून विलंब होत आहे.मात्र येत्या दोन तिन दिवसातच वेबसाईट सुरू होईल अशी आशा आहे व वेबसाईट सुरू होताच दुरुस्तीचे बिल देय करून रुग्णवाहिका किनगाव प्राथमिक आरोग्य केंद्राला उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करण्यात येईल असे जिल्हा वैद्यकीय अधिकारी डॉ.सचिन भायेकर यांनी म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.