भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस कमेटी विमुक्त जाती व भटक्या जमातीच्या तालुका अध्यक्षपदी किरण भवरे यांची निवड !!
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.९ मे २६ शनिवार
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस विमुक्त जाती व भटक्या जमाती विभागाकडून राज्यभर ब्लॉक अध्यक्षांच्या नियुक्त्या नुकत्याच जाहीर करण्यात आल्या असून त्यामध्ये रावेर व यावल तालुक्यांचाही समावेश आहे.यात यावल काँग्रेस विमुक्त जाती व भटक्या जमाती अध्यक्षपदी किरण प्रदीप भवरे (परसाडे तालुका यावल) यांची तसेच रावेर तालुका काँग्रेस अध्यक्षपदी प्रताप दूबा राठोड (जुनोने) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
सदरहू सदर निवडीबद्दल या दोन्ही कर्तव्यदक्ष व पक्षनिष्ठ पदाधिकाऱ्यांचे अनेक स्तरातून अभिनंदन करण्यात येत असून पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देण्यात येत आहे.दरम्यान काँग्रेस विमुक्त जाती व भटक्या जमाती विभाग हे समाजातील वंचित,विमुक्त व भटक्या घटकांच्या हक्कांसाठी,न्यायासाठी आणि सामाजिक उन्नतीसाठी सातत्याने कार्यरत आहे.समाजातील शेवटच्या घटकापर्यंत काँग्रेस पक्षाचे विचार,धोरणे व जनकल्याणकारी योजना पोहोचवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य हा विभाग करत असतो.
येणाऱ्या काळात या विभागाच्या माध्यमातून काँग्रेस पक्षाचे विचार,धोरणे व निर्णय जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी हे दोन्ही पदाधिकारी निश्चितच परिश्रम घेतील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.