३० जून पर्यंत पीएम किसान ईकेवायसी करा अन्यथा पुढील हप्ते बंद !! कृषी अधिकारी शबाना तडवी यांची माहिती !!
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.१६ जून २६ मंगळवार
केंद्र सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येत असलेल्या पीएम किसान सन्मान निधी योजनेची ई-केवायसी करण्याची मुदत ही ३० जून २६ पर्यंत निर्धारित करण्यात आली असून सदर कालावधीपर्यंत पीएम किसान सन्मान निधी योजना लाभार्थी शेतकऱ्यांनी आपली केवायसी करणे बंधनकारक करण्यात आलेली आहे.सदरहू जे शेतकरी सदर योजनेची केवायसी करणार नाही अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.तरी संबंधित शेतकऱ्यांनी शासनाच्या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपली ई-केवायसी गाव पातळीवर ग्रामस्थरीय नोडल अधिकारी व क्षेत्रीय कर्मचारी तसेच ग्राहक सेवा केंद्रावर जाऊन करून घ्यावी असे आवाहन कृषी विभागचे अधिकारी शबाना तडवी यांनी केले आहे.
दरम्यान सदरील पीएम किसान योजनेची केवायसी हि मोबाईलद्वारे आधार कार्ड नंबर टाकल्यावर ओटीपीच्या साह्याने किंवा ग्राहक सेवा केंद्रावर पी एम किसान पोर्टलवर जाऊन चेहऱ्याच्या फेसद्वारे किंवा अंगठा लावून करून मिळणार आहे.सदरहू जे शेतकरी पीएम किसान सन्मान निधी योजनेची केवायसी करणार नाही अशा शेतकऱ्यांच्या खात्यात येणारा पुढील हप्ता बँक खात्यामध्ये जमा होणार नाही.यात दिव्यांग व वृद्ध शेतकऱ्यांसाठी विशेष सुविधा गाव पातळी ग्रामस्थरीय नोडल अधिकारी व क्षेत्रीय कर्मचारी तसेच आपले सरकार सेवा केंद्र यांच्या माध्यमातून पुरविली जाणार आहे.तरी संबंधित शेतकऱ्यांनी ३० जून २६ पर्यंत फेस ऑथींटीकेशनद्वारे इ-केवायसी पूर्ण करण्यास मदत करावी.सदरहू मुदतीमध्ये इ-केवायसी न केल्यास आगामी हप्ते थांबतील व त्यास संबंधित शेतकरी जबाबदार राहील अशी माहिती कृषी अधिकारी शबाना तडवी यांनी माहिती दिली आहे.