Just another WordPress site

यावल येथील बाल संस्कार विद्या मंदिरात गुरु पौर्णिमा उत्साहात साजरी !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.२९ जुलै २६ बुधवार

येथील बाल संस्कार विद्या मंदिर येथे श्री व्यास पौर्णिमा व गुरु पौर्णिमा पावन पर्वानिमित्त “गुरु विषयक वक्तृत्व स्पर्धेचे” उत्साहपूर्ण वातावरणात आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये गुरुजनांप्रती आदरभाव,भारतीय संस्कृतीतील गुरु-शिष्य परंपरेचे महत्त्व आणि वक्तृत्वकलेचा विकास घडवून आणण्याचा प्रयत्न करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक सुनील माळी उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन सरिता गायकवाड यांनी केले तर संजय चौधरी व चेतन चौधरी यांनी वक्तृत्व स्पर्धेचे परीक्षण करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे आभार अतुल पवार यांनी केले.

स्पर्धेत विद्यार्थ्यांनी मराठी,हिंदी,इंग्रजी तसेच संस्कृत भाषांमध्ये “माझे गुरु,माझी प्रेरणा” आणि “जीवनातील गुरुंचे महत्त्व” या विषयांवर आत्मविश्वासपूर्ण,अभ्यासपूर्ण व प्रभावी भाषणे सादर केली.विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून गुरुंचे जीवनातील स्थान,संस्कारांचे महत्त्व,ज्ञानदानाचे मूल्य आणि भारतीय संस्कृतीतील गुरु-शिष्य परंपरेचे महत्त्व प्रभावीपणे मांडत गुरुजनांप्रती कृतज्ञता व आदर व्यक्त केला.उपस्थितांनी विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ट वक्तृत्वाचे मनापासून कौतुक केले.या कार्यक्रमाची संकल्पना इयत्ता दुसरीचे पालक हेमंत मुळे गुरुजी यांनी मांडली.त्यांच्या प्रेरणेतून कार्यक्रमाला एक वेगळी उंची प्राप्त झाली.विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण व्हावी आणि त्यांच्या उत्कृष्ट सहभागाला प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने शालेय व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष पंकज गडे सर यांनी पुस्तक भेट स्वरूपात बहुमोल योगदान दिले.त्यांच्या या प्रेरणादायी सहकार्याबद्दल शाळेच्या वतीने मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.याप्रसंगी शाळेतील सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रम ज्ञान,संस्कार,कृतज्ञता आणि भारतीय परंपरेचा सुंदर संगम ठरला.कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Leave A Reply

Your email address will not be published.