यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.१५ ऑगस्ट २६ शनिवार
येथील पंचायत समितीचे ग्रामीण गृहनिर्माण अभियंता व संगणक चालक यांच्या विरूद्ध कोरपावली तालुका यावल या गावाचे माजी सरपंच तथा प्रशासक विलास अडकमोल यांच्या तक्रारी प्रशासनाने तात्काळ घेत अभियंता चौधरी यांची बदली तर संगणक चालक तडवी यांना नोटीस बजावण्यात आल्याने १५ ऑगस्टचे आमरण उपोषण स्थगित करण्यात आले आहे.
या संदर्भात कोरपावली तालुका यावल येथील ग्राम पंचायतचे माजी सरपंच व विद्यमान प्रशासक विलास नारायण अडकमोल यांनी यावल पंचायत समिती मधील कंत्राटी कर्मचारी ग्रामीण गृहनिर्माण अभियंता हर्षल चौधरी आणी संगणक ऑपरेटर जावेद तडवी यांच्या कारभारावर आक्षेप घेत या दोघ कर्मचाऱ्यांवर बदलीची कारवाई करण्यात यावी अशी मागणी यावलच्या गटविकास अधिकारी डॉ मंजुश्री गायकवाड यांच्याकडे तक्रार निवेदनाव्दारे केली होती.या दोघा कर्मचाऱ्यांची ८ दिवसाच्या आत बदली न झाल्यास आपण दिनांक १५ ऑगस्टपासुन आमरण उपोषण करू असे म्हटले होते. दरम्यान दिनांक १४ ऑगस्ट रोजी तक्रारकर्ते कोरपावली ग्रामपंचायत चे प्रशासकवितास नारायण अडकमोल यांच्या तक्रारीची दखल घेत यावल पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी डॉ मंजुश्री गायकवाड यांनी ग्रामीण गृहनिर्माण अभियंता हर्षल चौधरी यांची बदली केली असुन,घरकुल संगणक डाडा ऑपरेटर जावेद तडवी यांना आपल्या कामा विषयी तसेच दिरंगाई बाबत वारंवार तालुक्यातुन लाभार्थ्यांच्या तक्रारी करण्यात येत असून,आपण १५ दिवसांच्या आत सर्व घरकुल लाभार्थ्याचे कामे तात्काळ करावी अन्यथा आपल्या कारभाराची सुधारणा न झाल्यास वरिष्ठ पातळीवर आपल्यावर शक्तीची कार्यवाही बदली संदर्भात प्रस्ताव पाठवण्यात येइल अशी नोटीस घरकुल संगणक डाटा ऑपरेटर जावेद तडवी यांना देण्यात आली आहे . दरम्यान कोरपावली गावाचे ग्रामीण गृहनिर्माण अभियंता म्हणुन देवेन्द्र फेगडे यांच्याकडे देण्यात आल्याचे आदेश गटविकास अधिकारी डॉ मंजुश्री गायकवाड यांनी काढले असुन,त्यामुळे दिनांक १५ ऑगस्ट पासून पंचायत समिती समोर होणारे प्रशासक विलास अडकमोल यांचे आमरण उपोषण स्थगित ठेवण्यात आले आहे .