Just another WordPress site

राज्यपाल कोश्यारी पदमुक्त होण्याच्या चर्चांना उधाण ?

राजभवनाची खिंड पडली.आवाज शिवसेनेचाच! जय महाराष्ट्र! संजय राऊत यांचे ट्विट

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):- 

गेल्या काही दिवसांपासून वादग्रस्त वक्तव्याने चर्चेत असलेले राज्यपाल भगतसिंह कोश्यारी पदमुक्त होण्याची शक्यता आहे.राज्यपाल कोश्यारी यांनी आपल्या जवळील व्यक्तीकडे पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केल्याची चर्चा सुरु आहे.आपल्या राज्यात पुन्हा जाण्याची इच्छा आहे असे कोश्यारींनी म्हटले आहे.यावर शिवसेना(ठाकरे गट)खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.राज्यपाल महोदयांनी पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केली! ग्रेट.छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमाना विरोधात शिवसेनेने महाराष्ट्र बंदचे संकेत देताच पळापळ झालेली दिसते.तरीही महाराष्ट्राच्या शत्रूंशी लढाई सुरूच राहील!राजभवनाची खिंड पडली.आवाज शिवसेनेचाच! जय महाराष्ट्र! असे ट्विट संजय राऊत यांनी केले आहे.

यावर शिवसेना(ठाकरे गट) खासदार अरविंद सावंत यांनीही भाष्य केले आहे.महाराष्ट्र याचे जोरदार स्वागत करेल.महाराष्ट्राची अस्मिता आणि अभिमानाचा अवमान करणारी माणसे राज्यपाल पदाची प्रतिष्ठा मलिन करत आहेत. यापूर्वीच राज्यपालांचा राजीनामा अथवा त्यांना हटवलं पाहिजे होतं. राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त करणे, ही भाजपाची क्लृप्ती आहे. पण, राज्यपालांना मुक्त करून महाराष्ट्र तणाव मुक्त करा. यापुढे कोणी हिंमत करता कामा नये,” असे अरविंद सावंत यांनी म्हटलं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.