Just another WordPress site

“गुजरातमधील विजयात महाराष्ट्रातून पळवलेले मोठे उद्योगही फळले असावेत”उद्धव ठाकरेंची टीका

गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपाने १५० पेक्षा जास्त जागा जिंकत विक्रमी विजय नोंदवला आहे.या विजयासह गुजरातमध्ये सलग सातव्यांदा भाजपाचे सरकार येणार असल्याचे निश्चित झाले आहे.दरम्यान गुजरातमधील भाजपाच्या विजयानंतर शिवसेनेचे(उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचे अभिनंदन केले आहे.प्रसिद्धी पत्रकाद्वारे त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे.गुजरातमध्ये भाजपाने मिळवलेला विजय विक्रमी आणि ऐतिहासिक असल्याचे मत उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले आहे.“गुजरात निवडणूक पुन्हा एकदा मोदींच्या नेतृत्वात लढवण्यात आली होती त्यामुळे जनतेने भाजपाला भरघोस मतदान केले अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

पुढे बोलताना त्यांनी महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेलेल्या उद्योगांवरून मोदींना टोलाही लगावला.गुजरातमधील विजयात महाराष्ट्रातून पळवलेले मोठे उद्योगही फळले असावेत असे दिसते.पंतप्रधान नरेंद्र मोदी ११ तारखेला महाराष्ट्रात येत आहेत.मुंबई महापालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ते इथेही भरघोस घोषणा करतील अशी अपेक्षा असे ते म्हणाले.आपने गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणात मतविभागणी करुन भाजपाचा फायदा घडवून आणला हे स्पष्ट आहे.ज्यांचे त्यांचं राजकारण सोयीनुसार चालत असते अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.