Just another WordPress site

अल्पवयीन विद्यार्थीनीची छेडखानी करणाऱ्या युवका विरुध्द पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-

तालुक्यातील साकळी येथे बाहेर गावातुन शिक्षणासाठी येणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनींचा गावातील एका तरुणाने रस्ता अडवून त्यांच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करीत त्यांचा विनयभंग केल्याची घटना नुकतीच घडली आहे.याप्रकरणी साकळी येथील त्या विद्यार्थीनींची छेडखानी करणाऱ्या युवकाविरुध्द विनयभंगासह बाल लैंगिक अपराध प्रतिबंधक(पोक्सो) कायद्यान्वये यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तर छेडखानी करणाऱ्या संशयीत आरोपीस पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आले आहे.

याबाबत अधिक वृत्त असे की,तालुक्यातील किनगाव येथून साकळी येथे एका माध्यमिक विद्यालयात शिक्षण घेण्यासाठी काही विद्यार्थिनी एसटी बसने फाट्यावर उतरून साकळी फाट्या पासुन गावात पायी ये-जा करीत असतात.दि.१८ बुधवार रोजी काही विद्यार्थिनी एसटी बसने साकळी फाट्यावर उतरून फाट्या पासुन साकळी गावात पायी जात असतांना साकळी गावातीलच आबा उर्फ दीपक वसंत मराठे या युवकाने या विद्यार्थिनींचा रस्ता अडवत त्यातील एका अल्पवयीन विद्यार्थीनीच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून त्या विद्यार्थिनीची छेडखानी केली.परिणामी घाबरलेल्या विद्यार्थीनींनी घडलेला हा प्रकार आपल्या शाळेतील शिक्षकांना सांगितला त्यानुसार शिक्षकांनी त्वरीत सदरील प्रकाराबाबत विद्यार्थिनींच्या पालकांना माहिती दिली.विद्यार्थीनींच्या पालकांनी तात्काळ पोलीस ठाण्यात धाव घेऊन दिलेल्या फिर्यादी वरून आबा उर्फ दीपक वसंत मराठे यांच्या विरुद्ध बालकांचे लैंगिक अत्याचार पासून संरक्षण कायदा २०१२ पोस्को अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलिस निरिक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुदाम काकडे, हवालदार सिकंदर तडवी हे करीत आहे.या छेडखानी गुन्ह्यतील संशयीत आरोपी आबा उर्फ दीपक वसंत मराठे यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.