Just another WordPress site

दहिगाव येथील डॉ.बाबासाहेब यांच्या फलकाची विटंबना प्रकरणी पाच संशयित ताब्यात

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-

तालुक्यातील दहिगाव येथे गावातील मुख्य चौकातील महापुरुष डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताच्या निमित्ताने लावण्यात आलेल्या शुभेच्छा फलकाची विटंबना केल्याची घटना दि.१६ एप्रिल रविवार रोजी सकाळी उघडकीस आली असून गावातील वातावरण तणावपूर्ण झाले आहे.सदरील घटनेची खबर मिळताच फैजपूर उपविभागीय पोलीस उपअधीक्षक डॉक्टर कुणाल सोनवणे,पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर हे पोलीस ताफ्यासह घटनास्थळी पोहोचताच त्यांनी सर्वांना शांततेचे आव्हान केले आहे.दरम्यान गावातील वातावरण तणावपूर्ण शांत असून सर्व शेतीचे व्यवहार मात्र सुरळीत सुरू आहेत तसेच याठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात असून उपअधीक्षक डॉ कुणाल सोनवणे,पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर हे पोलीस अधिकारी व ताफ्यासह तळ ठोकून आहेत.

तालुक्यातील दहिगाव येथील मुख्य चौकातील शुभेच्छा फलकावरील थोर पुरुषाच्या प्रतिमेची दि.१५ एप्रिल शनिवार रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास अज्ञात समाजकंटकाने विटंबना केली.याबाबत आज दि.१६एप्रिल रविवार रोजी सकाळी घटनेचे वृत्त गावात कळताच मोठ्या संख्येने जमाव मुख्य चौकात जमून सुमारे तीन तास पोलीस चौकी समोर ठिय्या आंदोलन दिले.यावेळी पोलीस उपअधीक्षक डॉ कुणाल सोनवणे,पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर यांनी प्रशासनाच्या वतीने थोर पुरुषाच्या प्रतिमेचे शुद्धीकरण केले.या प्रसंगी सरपंच अजय अडकमोल,कोरपावली सरपंच विलास अडकमोल यांचेसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.गावात सध्या तणावपूर्ण शांतता असून चोपडा आणि विविध ठिकाणाहुन पोलीस प्रोटेक्शन मागविण्यात आलेले असून दंगा नियंत्रण पथकासह स्थानिक पोलीस अधिकारी पोलिस उपनिरिक्षक अविनाश दहिफळे, पोलीस उपनिरिक्षक सुनील मोरे,पोलीस उपनिरिक्षक सुनिता कोळपकर यांचेसह पोलीसांचा मोठा ताफा तैनात करण्यात आला आहे.दरम्यान महापुरुष डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या शुभेच्छा फलक विटंबना प्रकरणी पोलिसांनी पाच संशयीतांना ताब्यात घेतले असल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक डॉ.कुणाल सोनवणे यांनी पत्रकारांना दिली आहे.सदरील घटनेचा सर्वच थरातून निषेद नोंदविण्यात आला असून संबंधित गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आंबेडकर प्रेमींकडून करण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.