यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
वन विभाग जळगांव मधील यावल-चोपडा येथे धुळे प्रादेशिक वनवृत वनसंरक्षक डिगंबर पगार यांच्या दोन दिवसीय पाहणी दौऱ्यात सातपुडा क्षेत्रातील विविध ठिकाणी वन विभागाच्या वतीने करण्यात आलेल्या वनरक्षणासाठी केलेल्या सर्व उपाययोजनांची पाहणी करण्यात आली.त्यासोबतच वनअधिकारी व कर्मचारी यांना वन संरक्षण साहित्याचे वाटप देखील करण्यात आले.
याबाबत वनविभागाच्या सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की,वनविभागाच्या प्रादेशीक वनवृतचे वनसंरक्षक डिगंबर पगार यांचा यावल-चोपडा या तालुक्यातील वनक्षेत्राचा दोन दिवसीय पाहणी दौरा नुकताच संपन्न झाला.दौऱ्यादरम्यान वनसंरक्षक डिगंबर पगार यांनी या भागातील वनक्षेत्रातील ठिकाणांची पाहणी केली.यावेळी जमीर शेख उपवनसंरक्षक यावल वनविभाग जळगांव,प्रथमेश हडपे सहाय्यक वनसंरक्षक चोपडा-यावल,यांच्या प्रयत्नातून वन संरक्षण कामात उपयोगी असलेले दुर्बीण,कापडी तंबू,जीपीएस यंत्र,बॅटरी,वनउपज तपासणी नाक्यावर आणि मिळालेली बातमी नुसार रस्त्यावरील वाहनांची तपासणी करण्याकरिता वाहने थांबविण्यासाठी आवश्यक असलेले बॅरिगेट तसेच अवैध अतिक्रमण काढण्याचे व अवैध वृक्षतोड नियंत्रण करण्याचे कार्यवाही दरम्यान जमावापासून वनअधिकारी व वनकर्मचारी यांना स्वसंरक्षणासाठी शील्ड,हेल्मेट आणि चेस्ट गार्ड प्रोटेटोर आदी असलेले आवश्यक साहित्य वनपरिक्षेत्र अधिकारी यावल पुर्व,यावल पश्चिम, रावेर,गस्ती पथक यावल आणि वनपाल यांना सदरील साहित्य वाटप करण्यात आले.यावेळी धुळे विभागाचे वनसंरक्षक डिगंबर पगार यांनी उपस्थित वनक्षेत्रातील अधिकारी व कर्मचारी यांना महत्वाचे मार्गदर्शन व सुचना दिल्या.याप्रसंगी जमीर शेख उपवनसंरक्षक यावल वनविभाग जळगांव यांनी वनअधिकारी,वनकर्मचारी यांनी वनसंरक्षणाच्या कामात हलगर्जीपणा करु नये तसेच वनक्षेत्रात अवैधरित्या असलेले अतिक्रमण काढण्याची कार्यवाही करावी व आपल्या सर्वांच्या मदतीने वन्यजीव संरक्षण व जंगल संरक्षण कामकाज करावे असे मार्गदर्शन केले.या कार्यक्रमात विक्रम पदमोर वनपरिक्षेत्र अधिकारी यावल पुर्व,सुनील भिलावे वनपरिक्षेत्र अधिकारी यावल पश्चिम,अजय बावणे वनपरिक्षेत्र अधिकारी रावेर,वनपाल रविंद्र तायडे,अतुल तायडे,रज्जाक तडवी,राजेंद्र खर्चे, विपुल पाटील,राजु पाटील,विजय बोराडे,रविंद्र सोनवणे,अरविंद धोबी,राजु जाधव यांचे उपस्थितीत कार्यक्रम झाला.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विक्रम पदमोर वनपरिक्षेत्र अधिकारी यावल पुर्व यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रथमेश हडपे सहाय्यक वनसंरक्षक यावल यांनी मानले.