Just another WordPress site

विदर्भात ३५ ठिकाणी “हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना” सुरू होणार

नागपूर-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यांमध्ये  १ मे २३ पासून तब्बल ३५ ठिकाणी “हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना” सुरू होणार असून त्यापैकी सर्वाधिक १४ दवाखाने हे नागपूर जिल्ह्यात राहणार आहेत.या सर्व दवाखान्यांमध्ये नि:शुल्क उपचार-तपासणी व औषधांची सोय देखील राहणार आहे हे विशेष !

 

शिंदे-फडणवीस सरकारने प्रथम मुंबईत नुकतीच ही योजना सुरू केली असून आता या योजनेचा राज्यभरात विस्तार करण्यात येत आहे. त्यानुसार १ मे २३ रोजी नागपूर जिल्ह्यातील १३ तालुक्यांसह नागपूर शहरात १ असे एकूण १४ दवाखाने तसेच वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया,भंडारा या जिल्ह्यांतही २१ दवाखाने असे एकूण ३५ दवाखाने सुरू होणार आहेत.या दवाखान्यांमध्ये रुग्णावर औषधोपचार,विविध रक्तचाचण्या व औषधही मोफत मिळतील.”हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्यात हा संपूर्ण उपचारच नि:शुल्क राहील. याशिवाय एक्स-रे,सोनोग्राफी या निदान चाचण्यांकरिता संलग्न असलेल्या डायग्नॉस्टिक (निदान) केंद्रांवर स्वस्त दरात तपासणी करण्यात येईल. तसेच हे दवाखाने दुपारी २ ते रात्री १० या वेळात सुरू राहतील असे सूत्रांकडून कळविण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.